ETV Bharat / state

सांगली महापालिकेकडून अतिधोकादायक इमारतींवर हातोडा; 12 इमारती जमीनदोस्त - सांगली

पालिका क्षेत्रात जवळपास 750 धोकादायक तर, 150 अतिधोकादायक इमारती असल्याचा अहवाल समोर आला होता. पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी धोकादायक बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते.

अतिधोकादायक इमारतींवर कारवाईला सुरूवात
author img

By

Published : Jul 19, 2019, 10:35 AM IST

सांगली - शहरात प्रशासनाकडून महानगरपालिका क्षेत्रातील 35 अतिधोकादायक इमारती पाडण्याची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 12 धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून, पालिका क्षेत्रात सुमारे 750 इमारती धोकादायक तर, 150 इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया

मुंबईतील डोंगरी भागातील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेने सांगली, मिरज आणि कुपवाड भागातील धोकादायक बांधकामांसंदर्भात ही खबरदारीची मोहीम राबवली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यासोबतच धोकादायक बांधकामे पाडण्याचे आदेश पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले होते. यानुसार पालिका क्षेत्रात जवळपास 750 धोकादायक तर, 150 अतिधोकादायक इमारती असल्याचा अहवाल समोर आला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने अतिधोकादायक असणाऱ्या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील एकूण 15 इमारतींवर कारवाई झाली आहे. जोरदार पाऊस पडल्यास या इमारती कोसळण्याची शक्यता होती. यामुळे तातडीची खबरदारी म्हणून पालिकेने संबंधित मोहीम हाती घेतली. स्थानिक रहिवाशांना आणि घर मालकांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली

Avb

Feed1send file name - mh_sng_02_dhokadayak_imarati_karwai_vis_1_7203751 - to -
mh_sng_02_dhokadayak_imarati_karwai_vis_5_7203751

स्लग - अतिधोकादायक इमारती पाडण्यास पालिकेकडून सुरवात,१५ इमारती आल्या पाडण्यात..

अँकर - सांगली महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारती पाडण्यास सुरवात केली आहे.महापालिका क्षेत्रातील ३५ अतिधोकादायक इमारती पाडण्याची आज पालिका प्रशासनाकडून मोहीम राबवत १२ धोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रात सुमारे 750 इमारती धोकादायक तर 150 इमारती अतिधोकादायक असल्याचा समोर आला आहे.Body:
व्ही वो - मुंबईतील डोंगरी भागातील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या धोकादायक इमारतींचा सर्व्हेक्षण करण्याच्या बरोबर धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले होते.यानुसार पालिका क्षेत्रात जवळपास 750 धोकादायक तर 150 अतिधोकादायक इमारती असल्याचा अहवाल आला होता.त्यानुसार पालिका प्रशासनाने आजपासून अतिधोकादायक असणाऱ्या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे.आज सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील १५ इमारती पाडण्यात आल्या आहेत.जेसीबी व पोलीस संरक्षणात सुरक्षितपणे अतिधोकादायक बनलेल्या इमारती पाडण्यात आल्या आहेत.एखादा जोरदार पाऊस पडल्यास या इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने,तातडीची खबरदारी म्हणून पालिकेने या धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे.तर ज्या धोकादायक इमारत आहेत, तेथील नागरिकांना आणि घर मालकांना पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बाईट: सहदेव कावडे, सहायक आयुक्त - सांगली महापालिका.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.