ETV Bharat / state

सांगली लोकसभा : भाजपचे संजयकाका पाटील विजयी; तिरंगी लढतीत मारली बाजी

सांगली मतदार संघातून भाजपचे संजयकाका पाटील तर आघाडीकडून स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील हे मैदानात उतरले होते. तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले होते.

author img

By

Published : May 23, 2019, 6:10 AM IST

Updated : May 23, 2019, 9:35 PM IST

सांगली लोकसभा LIVE: काँग्रेसचा गड 'स्वाभिमानी' परत मिळवणार का? तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी
  • ७. ४० - भाजपचे संजयकाका पाटील यांचा विजय
  • २:५३ - भाजपचे संजयकाका पाटील 70 हजार 583 मतांनी आघाडीवर
  • २:०० - सांगली लोकसभा सातवी फेरी -

भाजप - संजयकाका पाटील २ लाख १९ हजार ५१५ मते

वंचित बहुजन आघाडी - गोपीचंद पडळकर १ लाख २३ हजार ३१२ मते

स्वाभिमानी पक्ष - विशाल पाटील १ लाख ४८ हजार ९३२ मते

  • २:३४ - संजय पाटील ६३ हजार ९४१ मतांनी आघाडीवर
  • १२:२६ - संजयकाका पाटील ३९ हजार ४८१ मतांनी आघाडीवर
  • १२:०७ - संजयकाका पाटील ३४ हजार मतांनी आघाडीवर
  • १०:१२ - संजयकाका पाटील ९ हजार मतांनी आघाडीवर
  • १०:०९ - दुसऱ्या फेरीत संजयकाकांना १६ हजार ४१२, गोपीचंद ११ हजार २९० तर विशाल पाटील यांना १० हजार ७३८ मते
  • १०:०८ - पहिल्या फेरीत भाजपच्या संजयकाका पाटील यांना १० हजार ३७२, गोपीचंद पडळकर ८ हजार ३३९ तर विशाल पाटील यांना ६ हजार मते
  • ९:४७ - भाजपचे संजयकाका पाटील २ हजार ३१ मतांनी आघाडीवर
  • ९:१७ - सांगलीत विशाल पाटील १२०० मतांनी आघाडीवर
  • ९:१५ - मतमोजणी प्रतिनिधी आणि पोलिसांचे मध्ये प्रवेशावरून वादावादी
  • ९:१४ - सांगलीत ४५ मिनीटे उशीराने मतमोजणीला सुरूवात
  • ८:०० - सांगली मतदारसंघातील मतमोजणीला उशीर
    तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी

सांगली - सांगली मतदारसंघातील मतमोजणीला उशीर झाला. मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊस कार्पोरेशन गोडाऊनमध्ये ही मतमोजणी झाली आहे. यावेळी या मतदार संघातून भाजपचे संजयकाका पाटील तर आघाडीकडून स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील हे मैदानात उतरले होते. तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले. मात्र पाटील आणि पडळकर यांचा पराभव करत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी बाजी मारली.

सांगली लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात मिरज, सांगली, जत, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, तासगांव-कवठेमहांकाळ यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये येथे ६३.५२ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ६५.४१ टक्के मतदान झाले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ ७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या हातात राहिला आहे. वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगली लोकसभेचे २ वेळा नेतृत्व केले. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपच्या संजय पाटील यांनी तब्बल २ लाख ३८ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीच्या विजयाचे परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावरही झाले. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात ३ भाजप आणि १ शिवसेनेचा आमदार आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत कलह

काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून बराच कलह झाला होता. प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील वसंतदादा विरुद्ध पतंगराव कदम गटातील संघर्ष उघड झाला. या संघर्षामुळे गेली ७० वर्षे आणि त्यातील ३५ वर्षे एकहाती सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या दादा घराण्याचा पत्ता कट झाला. त्यामुळे काँग्रेसने सांगलीची जागा मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला दिली.

विशाल पाटलांचा बंड

काँग्रेस आणि पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्यातून सांगली लोकसभेची उमेदवारी गेल्याने वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला. मात्र, स्वाभिमानीने विशाल पाटील यांना पक्षाची उमेदवारी देत लोकसभेच्या मैदानात उतरवले.

गोपीचंद पडळकरांचा बंड

दुसरीकडे भाजप पक्षातील नेत्यांनी थेट वरिष्ठ पातळीवर संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. अखेर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ऐनवेळी संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण यातून पक्षातील एकेकाळचे स्टार प्रचारक व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंड केले. भाजपचे बंडखोर मानले जाणारे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीतून उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमधून संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्या विरोधात शड्ड् ठोकला.

त्यामुळे या निवडणुकीत भाजपकडून गड राखला जाणार ? की काँग्रेसच्या हातातून गेलेला गड स्वाभिमानी परत मिळवून देणार ? की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.