सांगली - सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घर जळून खाक झाली ( Sangli Gas Cylinder blast ) आहे. यामध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पाच जण किरकोळ जखमी झाली ( Gas Cylinder Blas Five Injured ) आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
गॅस स्फोटात चार घरे जळून खाक
शहरातील पंचशीलनगर झोपडपट्टीत दुपारच्या सुमारास एका घराला आग लागली. त्या घरात असणाऱ्या सिंलेडरचा स्फोट झाल्याने ही आग शेजारील तीन घरांना लागली. काही वेळातच सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. तेव्हाच अन्य घरांतील सिंलेडर बाहेर काढताना एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये अग्नीशमन दलाच्या एका कर्मचाऱ्यासह पाच नागरिक किरकोळ जखमी झाले.
अन्यथा झोपडपट्टी झाली असती खाक...
गॅस सिलेंडरमुळे लागलेल्या आगीमध्ये चार घरे जळून खाक झाली आहेत. त्यात चार कुटुंबांचे संसार पुर्णत: जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा 50 हून अधिक घरे असणारी झोपडपट्टी जळून राख झाली असती, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.