ETV Bharat / state

Sangli Crime News : पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याच्या रागातून, जावयाने उचलले 'हे' पाऊल - पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याच्या रागातून

सांगलीत जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने सासऱ्याची निर्घुण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे.

Sangli Crime News
जावयाने सासऱ्याची केली निर्घुण हत्या
author img

By

Published : Jan 14, 2023, 1:07 PM IST

सांगली : बायकोला नांदवायला पाठवत नसल्याच्या रागातून एका जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यातील दरीबडची येथे घडला आहे. आप्पासो मल्लाड असे (वय 48 वर्षे) मृत सासरयाचे नाव आहे. याप्रकरणी जावई व त्याचा भाऊ असे चौघा जणांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय : जत तालुक्यातल्या दरीबडची येथील आप्पासो मल्लाड, यांची मुलगी तेजश्री हीचं दीड वर्षांपूर्वी कर्नाटक मधल्या अथणी तालुक्यातील एगळी गावातल्या सचिन बळोळी याच्याशी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसात पती-पत्नी मध्ये घरगुती वाद सुरू झाला, पती सचिन हा पत्नी तेजश्री हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करत असे, याला कंटाळून तेजश्री हि एक वर्षापूर्वी आपल्या माहेरी निघून आली होती.

गैरसमजातून काढला काटा : सध्या तेजश्री ही आपल्या माहेरी राहत आहे. तसेच पती पासून वेगळे होण्यास तिने घटस्फोटासाठी जत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान घटस्फोट देण्यास नकार देत पत्नीला नांदायला पाठवा, अशी मागणी वारंवार सचिन बळोळी याने माहेरच्या मंडळींच्याकडे केली होती. यातून सासरे आप्पासो मल्लाड, हे आपल्या बायकोला नांदायला पाठवत नाही, असा समज जावई सचिन बिरोळे यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता.

गुन्हा दाखल : या रागातून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सचिन बळोळी हा आपला भाऊ मिलन बळोळी व अन्य दोघांच्यासह दरीबडीची या ठिकाणी पोचला आणि उसाच्या शेतामध्ये काम करत असलेल्या सासरे आप्पासो मल्लाड यांना गाठत त्यांच्यावर कोयता व धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर जावई फरार झाला असून; या प्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये सासऱ्याच्या हत्या प्रकरणी जावयासह चौघांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे.

याआधी देखील घडली होती अशी घटना : अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातील मरखेल येथे 2020 मध्ये घडली होती. सासरच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीस माहेरी ठेवणाऱ्या सासऱ्याचा सासरवाडीत येऊन, जावयाने निर्घृण खून केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.