सांगली - घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीला विटा पोलिसांनी ( Vita Police ) जेरबंद केले आहे. 3 आरोपीना अटक ( Accused arrested ) करत त्यांच्याकडून पाऊणे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त ( Confiscation goods ) करण्यात आला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
3 आरोपींकडून पाऊणे दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत - सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला आहे. तिघा घरफोडी आरोपींकडून पाऊणे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रतीक उर्फ नारायण जाधव ( वय- 21 ) राहणार वाघेश्वर, तालुका कराड, जि. सातारा, गौतम माळी ( वय- 21 ) राहणार मायणी, तालुका खटाव, जि.सातारा आणि अनिकेत गायकवाड ( वय- 22 ) राहणार निहारवाडी रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, असे अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित आरोपीची नावे आहेत. विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला कडेगाव एमआयडीसी येथील अनिकेत पवार यांच्या रूममध्ये घरफोडी करणारे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तिघांना ताब्यात घेऊन, त्यांची सखल चौकशी केली. त्यांच्याकडून विटा पोलीस ठाण्यात हद्दीतील एक, तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील एक आणि सातारा जिल्ह्यातल्या उंब्रज आणि औंध पोलीस ठाणे हद्दीतील 2 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली देण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती विटा पोलिसांनी दिली - त्यानंतर तिघांनाही अटक करत त्यांच्याकडून घरफोडी करून चोरण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये चांदीच्या दागिन्यांच्यासह एलसीडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन व एक बोलेरो गाडी, असे 9 लाख 72 हजारांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. या प्रकरणाची माहिती विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.
हेही वाचा - Breaking अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हेही वाचा - Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे