सांगली - देशातील भाजप सरकार लोकशाही मारण्याचे पाप करत आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली. भाजपच्या या हुकूमशाही सरकारला आता टिकू देणार नाही, असा इशाराही मंत्री कदम यांनी दिला. केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्यांविरोधात सांगलीमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बेमुदत संपावर जाण्याचा दिला इशारा
केंद्र सरकारचा नवा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी जाचक आहे. शेतकऱ्यांची केवळ लूट होणार असून शेतकऱ्यांची पंख या कायद्यामुळे छाटली जातील. कामगार कायद्यामुळे उद्योगपतींना अधिक फायदा होणार आहे आणि कामगारांची गळचेपी होणार आहे. केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे हे केवळ मूठभर उद्योगपतींसाठी असल्याची टीकाही मंत्री कदम यांनी केली आहे. केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीला मारण्याचे पाप करत असून या हुकुमशाही सरकारला आता काँग्रेस टिकू देणार नाही, असा इशाराही मंत्री विश्वजीत कदम यांनी दिला.
हेही वाचा - दुर्दैवी..! चार वर्षांच्या दोघा जुळ्या बहिणींचा तलावात बुडूून मृत्यू