सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीतील कांद्याचे सौदे उधळून लावण्यात आले आहेत. 2600 रुपयांवरून थेट 1100 रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट बाजार समितीच्या आवारात जाऊन सुरू असलेला कांदा लिलाव बंद पाडला. त्यामुळे विष्णूअण्णा फळ मार्केट आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Onion Rate in Sangli : कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त, 'स्वाभिमानी'ने बंद पाडले सौदे - Onion Rate in Sangli
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीतील कांद्याचे सौदे उधळून लावण्यात आले आहेत. 2600 रुपयांवरून थेट 1100 रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट बाजार समितीच्या आवारात जाऊन सुरू असलेला कांदा लिलाव बंद पाडला.

Sangli Bazar Samiti
सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीतील कांद्याचे सौदे उधळून लावण्यात आले आहेत. 2600 रुपयांवरून थेट 1100 रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट बाजार समितीच्या आवारात जाऊन सुरू असलेला कांदा लिलाव बंद पाडला. त्यामुळे विष्णूअण्णा फळ मार्केट आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
'स्वाभिमानी'ने बंद पाडले कांद्याचे सौदे
सांगलीच्या विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये सुरू असलेले कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. मंगळवारपर्यंत बाजर समितीच्या आवारातील कांदा सौद्यामध्ये मध्ये 2600 ते 2700 रुपयां पर्यंत दर होता.त्यामुळे सोलापूरसह आसपासच्या परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा सांगली या ठिकाणी विक्रीसाठी आणला होता.मात्र मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने थेट 1500 पासून 500 ते 1100 रुपये क्विंटल इतका कांद्याचा दर निघाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत व्यापाऱ्यांच्याकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोप केला.
दर नाही, तर सौदे नाही..
याची माहिती मिळताच तातडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी धाव घेत सर्व प्रकाराची माहिती घेत शेतकऱ्यांच्यावर हा अन्याय असल्याची भूमिका मांडली. कालपर्यंत जो दर होता, तोच दर मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. दर वाढल्याशिवाय कांद्याचे सौदे सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे कांद्याची सौदे बुधवार सकाळपासून बंद झाले आहेत.

Last Updated : Dec 15, 2021, 8:10 PM IST