ETV Bharat / state

संभाजी भिडे म्हणाले- कोरोना अस्तित्वात नाही, जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील - सांगली

प्रजा बावळट असून कोरोना अस्तित्वात नाही. ज्याला जगायचे असेल तो जगेल, ज्याला मारायचे असेल तो मरेल, पण सरकारने यात लक्ष घालू नये, असा सल्ला दिला. कोरोनाच्या नावाखाली देशात खेळखंडोबा सुरू असल्याची टीका भिडे यांनी केली आहे.

संभाजी भिडे गुरूजी
संभाजी भिडे गुरूजी
author img

By

Published : Apr 8, 2021, 2:12 PM IST

Updated : Apr 8, 2021, 3:10 PM IST

सांगली - वादग्रस्त वक्तव्य करण्याची परंपरा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कायम ठेवली असून कोरोनावरून त्यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले आहे. प्रजा बावळट असून कोरोना अस्तित्वात नाही. ज्याला जगायचे असेल तो जगेल, ज्याला मारायचे असेल तो मरेल, पण सरकारने यात लक्ष घालू नये, असा सल्ला दिला. कोरोनाच्या नावाखाली देशात खेळखंडोबा सुरू असल्याची टीका भिडे यांनी केली आहे, ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
भिडे सरकारवर भडकले..
राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याविरोधात सांगलीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भिडेसुद्धा सहभागी झाले होते. यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कोरोना तर अस्तित्वात नाही...
कोरोना हा अस्तित्वात नाही. अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कुट्ट अंधारात शोधण्यासारखे या रोगाचा प्रकार सूरू आहे. तर कोरोना, कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येक जण आपापल्या जीवाची काळजी घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावे. लॉकडाऊनची गरज नाही. तसेच सरकारने व्यसने वाढवायचे काम चालू केले आहे का? असा सवाल करत गांजा, मटका, अफू ओढणारे सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद हे कसे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या नावाखाली खेळखंडोबा...

मास्कबाबत बोलताना कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचे सिद्धांत काढला आहे, मास्क लावण्याची गरज नाही. तसेच मास्क नसला की पोलीस काठ्या मारतात हा मूर्खपणा आहे. तसेच कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरू आहे. कोरोनाबाबत केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असून प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी असून जे जगायचे ते जागतील. जे मारायचे ते मारतील, असे मत भिडे यांनी व्यक्त केले.

गांधीच्या आदर्शाने कोरोना वाढणार...
कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटावरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील. केवळ कोरोना-कोरोना आक्रोश चालले आहे. कोरोना अस्तित्वात नाही. त्यामुळे-लॉकडाऊनची गरज नाही. यामुळे सरकारने काही करू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Apr 8, 2021, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.