ETV Bharat / state

हिंदुस्थान म्हणून जगण्यासाठी शिवसेनाच आवश्यक - संभाजी भिडे

author img

By

Published : Jan 23, 2021, 7:07 PM IST

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्थानक चौकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह भाजपचे नगरसेवक व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना भिडे यांनी शिवसेनेवर कौतुकांचा वर्षाव करत शिवसेनेच्या कारभारावर प्रश्नही उपस्थित केले.

सांगली
सांगली

सांगली - या देशाला भारत नव्हे तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. तसेच देशाच्या नोटांवर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद शिवसेनेच्या कार्यातच शक्य असल्याचे मतही भिडे यांनी व्यक्त केले. सांगलीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सांगली

बाळासाहेबांना अभिवादन..
सांगलीतील स्थानक चौकाचे महापालिकेच्यावतीने नामकरण करण्यात आले आहे. या चौकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक असे नाव देण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह भाजपचे नगरसेवक व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना भिडे यांनी शिवसेनेवर कौतुकांचा वर्षाव करत शिवसेनेच्या कारभारावर प्रश्नही उपस्थित केले.
गल्लो-गल्ली शिवसेनेच्या शाखा हव्यात..
भिडे म्हणाले की, सांगलीच्या स्थानक चौकाचे नामकरण होत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. मात्र, याला विलंब झाला आहे. हे काम 25 वर्षांपूर्वी होणे गरजेचे होते. बाळासाहेब ठाकरे यांची खूप आकांक्षा होती, शिवसेना देशात गेली पाहिजे. आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड हयात असलेल्या लोकांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. चौकाचे नामकरण होईल, पण त्याच्या विकासाचे काय? सांगली गावात शिवसेनेच्या 200 ते 250 शाखा का नाहीत? नामकरण होत आहे, पण खरे नामकरण हे गल्ली-बोळात शिवसेनेच्या शाखा होणे आवश्यक आहे.
भारत नव्हे हिंदुस्थानासाठी शिवसेना आवश्यक...
लोकसेवा तत्पर पाहिजे, प्रवाह अखंड तेवत ठेवला पाहिजे. पद, पैसा हे क्षुल्लक आहे. संपूर्ण देश हिंदुत्ववादाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोटांवरती छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असणारा देश घडवायचा आहे, ते काम केले पाहिजे, आणि ते कार्य फक्त शिवसेनेच्या कार्यात शक्य आहे. तसेच या देशाला भारत नव्हे तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे, असे माझे राजकीय नव्हे तर राष्ट्रीय मत असल्याचे यावेळी भिडे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.