सांगली: कुपवाड शहरानजीक जंगलातून भटकत एका भले मोठे सांबर पोहचले आहे. कुपवाड नजीक असणाऱ्या चाणक्य चौक परिसरातील एका शेतामध्ये हे सांबर दिसून आले आहे. यानंतर वन विभागाकडून तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सांबरला रेस्क्यू करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दंडोबा अभयारण्यातून आल्याचा अंदाज: सदरचे सांबार हे मिरज एमआयडीसी मार्गे अहिल्यादेवी होळकर स्मारक चाणक्य चौकातील पाण्याच्या टाकीच्या पूर्व बाजूला सांबर आले आहे. त्यामुळे हा सांबर दंडोबा अभयारण्यातून आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वनविभाग आणि पोलिसांना सहकार्य: तर परिसरातील नागरिकांनी भयभीत होऊ नये. सांबर हा हिंस्त्र प्राणी नाही. त्यामुळे लोकांनी त्याच्या मागे धावू नये. लोकांनी त्याला दगड मारू नये, त्याच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नागरिक, एनजीओ वनविभाग आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.