ETV Bharat / state

कोरोना रुग्णांना मोफत जेवण देणारे अवलिया सचिन पवार व त्यांच्या पत्नी ज्योती, रोज पुरवतात 100 डबे - इस्लामपूर कोरोना न्यूज

सचिन पवार व त्यांच्या पत्नी ज्योती पवार या कोरोना रूग्णांना मोफत जेवण देत आहेत. ते रोज 100 डबे पुरवत आहेत. डब्यामध्ये 3 चपात्या, 1 अंडे, भात, 2 भाज्या असे उत्कृष्ट जेवण दिले जाते.

इस्लामपूर
इस्लामपूर
author img

By

Published : May 7, 2021, 5:53 PM IST

सांगली - सचिन पवार हे कोरोना रूग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. ते सांगली, इस्लामपूर येथील सर्व रूग्णालयातील कोरोना रुग्णांना मोफत जेवण देत आहेत. त्यामुळे अवलिया सचिन पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोरोना रुग्णांना मोफत जेवण देणारे अवलिया सचिन पवार व त्यांच्या पत्नी ज्योती

सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपले लोक परके होताना दिसत आहेत. मात्र, सचिन पवारसारखे अवलिया परक्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्यांना लढण्यास बळ देत आहेत. यातून अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याच्याकडे बगण्याचा लोकांचा दृष्टीकोनच बदलतो. तर कित्येक नातेवाईकांनी अशा लोकांकडे जाणेही टाळले आहे. मात्र इस्लामपुरातील सचिन पवार व त्यांच्या पत्नी ज्योती पवार यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून रुग्णांसाठी काहीतरी करण्याचे ठरवले.

सध्या कोरोनाच्या रुग्णांना व त्यांच्या सेवेला असणाऱ्या व्यक्तीला जेवणाची गरज असल्याचे ओळखून ज्योती यांनी मोफत जेवणाचे डबे पुरवायचे निश्चित केले. सचिन पवार यांनी आपल्या सुधीर कापूरकर, प्रा. रमेश पाटील, थोर समाजसेवक सुनील शिंदे, रोहन कांबळे या मित्रांबरोबर चर्चा करून जेवणाचे डबे मिळतील, अशी सोशल मीडियावर जाहिरात सुरू केली. त्यानुसार इस्लामपूर येथील शासकीय व खासगी रुग्णालयातील रुग्णांची माहिती घेऊन त्यांना डबे पुरवण्याचे काम सुरू केले. ते रोज 100 डबे पुरवत आहेत. डब्यामध्ये 3 चपात्या 1 अंडे, भात, 2 भाज्या असे उत्कृष्ट जेवण दिले जाते.

मानव अधिकार सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हाअध्यक्षा पूजा महेश माळी या सचिन पवार यांच्या पत्नीला मदत करत आहेत. पूजा या दिवसभर थांबून जेवण बनवण्यास ज्योती यांना मदत करत आहेत. तर महेश माळी हे रुग्णालयात डबे पोहोच करून सचिन पवार यांना मदत करत आहेत. मानव अधिकार जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश जगताप हे डबे भरण्यासाठी मदत करतात. प्रा. रमेश पाटील तेलाचे डबे देत आहेत. तसेच ते डबे पोहोचवण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत. अशा प्रकारे सचिन पवार यांच्या सत्कार्याला हातभार लावण्यासाठी शहरातील विविध संघटना व कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत.

सचिन पावर व त्यांचे कुटुंबीय नेहमीच समाजकार्यासाठी पुढे येतात. मग 2019चा महापूर असो की कोरोनासारखी महामारी. शहरातील सर्व रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर उत्कृष्ट असे जेवण मिळत असल्याने सचिन पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सध्या एवढ्यावर न थांबता कोणाला कसलीही मदत लागली तर मी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची सेवा करणार असल्याचे सचिन पवार यांनी बोलून दाखवले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय मदतीतही केंद्राने डावलले, सचिन सावंतांचा आरोप

हेही वाचा - १८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती - टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.