सांगली - जिल्ह्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांमध्ये 1 जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 पर्यंत आता अत्यावश्यक सेवेतील किराणा, फळ, मटण, खाद्य, दूध, बेकरी दुकाने आणि भाजी मंडईला विक्रीसाठी परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जाहीर केले आहे. तसेच ज्याठिकाणी नियमांचे उल्लंघन होईल त्याठिकाणी कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
सांगलीकरांना मिळाला दिलासा..
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिलपासून कडक निर्बंध सांगली जिल्ह्यात लागू होते. मात्र आता वाढता प्रादुर्भाव कमी होत आहे. सांगली जिल्ह्याचा सध्याचा पॉझिटिव्हिट दर हा कमी येत असून 16.75 टक्के इतका दर आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सुचनेनुसार कडक निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात येत असल्याचा निर्णय सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी घेतला आहे.
सांगलीकरांना दिलासा.. कडक निर्बंधांमध्ये शिथिलता, सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत विक्रीची परवानगी
सांगली - जिल्ह्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांमध्ये 1 जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 पर्यंत आता अत्यावश्यक सेवेतील किराणा, फळ, मटण, खाद्य, दूध, बेकरी दुकाने आणि भाजी मंडईला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.