ETV Bharat / state

Corona Update:सांगलीकरांना मोठा दिलासा, 'त्या' २४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; मरकझ संबंधितांचाही समावेश.. - relief for sangli peoples all twenty four persons report came negative

सांगलीतील २४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील जनतेला आणि जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. मरकझशी संबधित 11 जणांचा यात समावेश आहे.

relief for sangli  peoples all twenty four persons report came negative
Corona Update:सांगलीकरांना मोठा दिलासा, 'त्या' २४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; मरकझ संबंधितांचाही समावेश..
author img

By

Published : Apr 4, 2020, 1:25 PM IST

सांगली- जिल्ह्यातील २४ जणांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दिल्ली येथील निजामुद्दीन मरकझशी संबंधित ११ जणांचा समावेश आहे. त्यामुळे सांगलीकर आणि जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर जे २५ जण कोरोनाग्रस्त आहे, त्यांची प्रकृती स्थिर असून येत्या २ दिवसात त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सुमारे २४ जणांचे नमुने गेल्या दोन दिवसात स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आले होते. यामधील २४ जणांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. या मध्ये २४ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामधील ११ जण हे दिल्लीच्या मरकझशी संबंधित होते. तर उर्वरित १३ जण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते.

४ जणांचे रिपोर्ट हे गुरुवारी रात्री, १० जणांचे रिपोर्ट हे शुक्रवारी दुपारी आणि १० जणांचे रिपोर्ट हे सायंकाळी प्राप्त झाले असून या सर्व २४ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे .

२५ कोरोनाबाधित कुटुंबिय आहेत, त्यापैकी सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असून यापैकी जे सुरुवातीचे चार कोरोना बाधित व्यक्ती आहेत. त्यांची आता येत्या २ दिवसात कोरोना टेस्ट होणार असल्याची माहिती विशेष कोरोना अधिकारी डॉ.पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

एक नजर सांगली जिल्ह्यातील कोरोना परस्थितीवर ...

परदेशवारी करणाऱ्यांची संख्या - १४५९ .

होम क्वारंटाईन व्यक्ती - ८८५ .

इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्यक्ती - ४६ .

आयसोलेशन व्यक्ती - २५

कोरोना बाधित रुग्ण - २५

तर आता पर्यंत ४१५ लोकांचे १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.