सांगली : सांगली शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (raping girl by luring marriage) गर्भवती करत जबरदस्तीने गर्भपात (Refusal of marriage and abortion) करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest news from Sangli)
तरुणीसोबत लव, सेक्स आणि धोका - सांगली शहरामध्ये राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या ओळखीतील तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर आरोपीने पीडितेला लग्नाचे अमीष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर ही तरुणी गर्भवती झाली होती. मात्र गर्भवती झाल्यानंतर तरुणीला तिची जात वेगळी असल्याचे कारण देत तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पडून गर्भपात केला होता.
बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : हा प्रकार हा एप्रिल २०२२ ते रविवार ०९ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडला. या अन्यायाविरोधात तरुणीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन संशयित अभिषेख सुधाकर काकडे याच्या विरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.