सांगली - 14 मार्च रोजी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यभरात विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपाच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले आहे.
जोरदार घोषणाबाजी
सांगलीमध्ये भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी रस्तारोको आंदोलन केले आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील पोलीस मुख्यालय कार्यालयासमोर आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या करून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे नुकसान
कोरोनाच्या नावाखाली या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा या सरकारचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. नियोजित वेळेप्रमाणे परीक्षा झाल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.