ETV Bharat / state

इस्लामपूर: बलात्काराची व्हिडिओ क्लिप बनवून महिलेला ब्लॅकमेल.. - महिलेला ब्लॅकमेल सांगली बातमी

पीडित महिला व संशयित आरोपी हा एका खासगी कपंनीत कामाला होते. पीडित महिला ही कंपनीतील काम करत असताना तेथे मॅनेजर पदावर काम करणाऱ्या भगवानसिंगने महिलेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.

blackmailing-a-woman-by-making-a-video-clip-of-physical-abused-at
बलात्काराची व्हिडिओ क्लिप बनवून महिलेला ब्लॅकमेल..
author img

By

Published : Jul 28, 2020, 1:36 PM IST

इस्लामपूर- बलात्काराची व्हिडिओ क्लिप संबंधित महिलेच्या मुलासह कुटुंबाला पाठवत 2 लाखांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. भगवानसिंग राजपुत ठाकूर (वय 26 रा. बिदर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.

कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत ठाकूरने सतत 2 वर्षे महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. बलात्काराचा व्हिडिओ नातेवाईक व कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी पीडित महिलेने याबाबत तक्रार दिली आहे.

पीडित महिला व संशयित आरोपी हा एका खासगी कपंनीत कामाला होते. पीडित महिला ही कंपनीतील काम करत असताना तेथे मॅनेजर पदावर काम करणाऱ्या भगवानसिंगने महिलेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतर त्याने वेळोवेळी धमकी देत जबरदस्तीने बलात्कार करत मोबाईलवर चित्रिकरण केले. त्यानंतर २०१९ मध्ये आरोपी नोकरी सोडून गेला.

दरम्यान, मार्च २०२० मध्ये पीडित महिलेच्या मोबाईलवर फोन करत दोन लाख रुपयांची मागणी आरोपीने केली. ते दिले नाहीस तर व्हिडिओ क्लिप नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. महिलेने आरोपीच्या खात्यावर सात हजार रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र आरोपीने पैशासाठी तगादा लावला.

आरोपीने महिलेच्या नातेवाईकांना ती क्लिप पाठवली आणि पैशाची मागणी केली. महिलेने त्रासाला कंटाळून ठाकूर याच्या विरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबबात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.