ETV Bharat / state

कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; शहरातील सखल भागात पुन्हा शिरले पाणी - flood

कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे.

कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ
author img

By

Published : Sep 9, 2019, 1:05 PM IST

सांगली - कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम असून पाणीपातळी सध्या 33 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे जवळपास 30 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. तर पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन एनडीआरएफ पथकांना पाचारण केले आहे.

कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. रविवारपासून ही वाढ पुन्हा होऊन पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. कोयना धरणातून सध्याच्या घडीला 53 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या ठिकाणी सध्या पावसाचा जोर मंदावला आहे, असे जरी असले तरी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे.

कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

हेही वाचा - भामरागड चौथ्या दिवशीही पाण्याखालीच; गोसीखुर्दचे पाणी सोडल्याने पुन्हा पुराचा धोका

चार दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने 34 फुटांपर्यंत पाण्याची पातळी पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. तर, कृष्णेचे वाढलेले पाणी शहरातल्या सखल भागात शिरले आहे. सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काकानगर, इनामदार प्लॉट या परिसरातही पाणी शिरत आहे, सध्या आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात पुन्हा महापुराची शक्यता, पंचगंगा कोणत्याही क्षणी ओलांडणार इशारा पातळी

Intro:mh_sng_02_pani_patli_wkt_7203751

स्लग - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ,शहरातील सखल भागात पुन्हा शिरू लागले पाणी,एनडीआर पथके दाखल ..

अँकर - सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे, सांगलीमध्ये कृष्णाची पाणीपातळी सध्या 33 फुटांवर पोहोचली आहे.त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी शिरू लागले,असून जवळपास 30 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेला आहे.तर
पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय म्हणून दोन एनडीआरएफ पथकांना पाचारण केले आहे.

Body:व्ही वो - कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झालेली आहे, कालपासून ही वाढ पुन्हा होऊन पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे.कोयना धरणातून सध्याच्या घडीला 53 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्या ठिकाणी सध्या पावसाचा जोर मंदावला आहे,असं जरी असलं तरी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे,चार दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने 34 फुटांपर्यंत पाण्याची पातळी पोहोचेल,असे अंदाज वर्तवले होते.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.तर कृष्णाचे वाढलेले पाणी शहरातल्या सखल भागात शिरू लागलेला आहे.सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काकानगर,इनामदार प्लॉट या परिसरातही पाणी शिरत आहे, सध्याआठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले असून,येथील जवळपास 30 हून अधिक कुटुंबांचं खबरदारी म्हणून स्थलांतर करण्यात आलेला आहे.याचा आढावा घेतला सांगली ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.