ETV Bharat / state

'महाविकास आघाडी सरकार घालवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू' - रामदास आठवले महाविकास आघाडी सरकार पाडणे वक्तव्य

केंद्रीय मंंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार नाही, असे पुन्हा एकदा भाकित केले आहे. सांगलीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

Ramdas Athavale
रामदास आठवले
author img

By

Published : Mar 15, 2021, 7:20 AM IST

सांगली - देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आम्ही मिळून सरकार जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असे भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले

कायदा सुव्यवस्था बिघडली आहे -

सांगलीतील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्यावतीने 'राजमाता आदर्श आई' पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. या समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवलेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरण, अंबानींच्या घरासमोर सापडलेली स्फोटके, दलितांवर होणारे अत्याचार, कोरोना रुग्णांची वाढती संख्या यासर्व गोष्टींवरून राज्यातील गोंधळ दिसतो आहे, असे आठवलेंनी सांगितले.

सरकार जाण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू -

नाना पटोले यांनी 'भविष्यात रामदास आठवले आपल्या सोबत असतील' या विधानावर आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे भविष्यात नाना पटोलेही आमच्यासोबत असतील, असा पलटवार आठवले यांनी केला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जावे, अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आम्ही मिळून आघाडी सरकार जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे आठवले यांनी सांगितले.

एमपीएससी परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत -

एमपीएससी परीक्षा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरही आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आपली ही मागणी आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या आरक्षणबाबत आपला त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण मराठा समाजासह देशातील क्षत्रिय, जाट, पटेल अशा समाजाला स्वतंत्र बारा टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. राज्यात देखील एमपीएससीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसारच झाल्या पाहिजेत, असेही आठवले म्हणाले.

आता 'नो कोरोना' -

देशात आणि राज्यात कोरोनाच्या सुरुवातीला आपण 'गो कोरोना' असा नारा दिला होता. आता आपला 'नो कोरोना' असा नारा असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. त्यांनी 'नो कोरोना', अशा घोषणाही दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.