ETV Bharat / state

खासगीकरणाकरता राज्यकर्त्यांकडून देशातील चळवळी संपवण्याचे कट-कारस्थान - राजू शेट्टी - Ex MP Raju Shetti

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये बीएसएनएल कंपनी कर्मचाऱ्यांचा कामगार मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी म्हणाले, सामान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आहे. आता कधी ही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो.

राजू शेट्टी
राजू शेट्टी
author img

By

Published : Oct 26, 2021, 8:56 PM IST

Updated : Oct 26, 2021, 10:07 PM IST

सांगली - देशात खासगीकरणासाठी राज्यकर्ते चळवळी संपवण्याचे कट कारस्थान करत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तर देशातील केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ धग धरून उभी आहे. बाकी सर्व चळवळी संपल्यात जमा झाल्या आहेत, असे मतही यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीमध्ये आयोजित कामगार मेळाव्यात बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये बीएसएनएल कंपनी कर्मचाऱ्यांचा कामगार मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी म्हणाले, सामान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आहे. आता कधी ही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे.

खासगीकरणाकरता राज्यकर्त्यांकडून देशातील चळवळी संपवण्याचे कट-कारस्थान

हेही वाचा-समीर वानखेडे प्रकरण; तपास यंत्रणांवर दबाव निर्माण करणे चुकीचे- प्रवीण दरेकर

मक्तेदारी मोडण्याचे सामर्थ्य केवळ चळवळीत-

देशात खासगीकरणासाठी राज्यकर्ते सगळ्या चळवळी संपवल्या आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ तग धरून आहे. पण कट कारस्थान करून देशातील सगळ्या चळवळ संपवण्याचे काम सुरू आहे. हे मोडून काढण्याची ताकत फक्त चळवळीमध्ये आहे. त्यामुळे आप-आपसातीलमधील मतभेद विसरून देशभरातील सर्व चळवळी एकत्र झाल्या पाहिजेत, असे मतही शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-माझा नवरा खोटारडा नाही, रोज काय स्पष्टीकरण द्यायचे- क्रांती रेडकर

Last Updated : Oct 26, 2021, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.