ETV Bharat / state

आयुष्यभर एकाच पक्षाशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - अलमट्टी धरण

Prof Sharad Patil Passes Away : जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं आज सकाळी हृदयविकारच्या झटक्यानं 81 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरनं त्रस्त होते.

माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील
माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 11:10 AM IST

Updated : Dec 27, 2023, 11:32 AM IST

सांगली Prof Sharad Patil Passes Away : जनता दलाचे (सेक्युलर) माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं आज सकाळी निधन झालं. मृत्यूसमयी त्याचं वय 81 वर्ष होतं. गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर आजारानं ते त्रस्त होते. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या तिकिटावर प्रा. शरद पाटील यांनी मिरज मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. याच मतदारसंघातून ते 1990 आणि 1995 अशा दोन टर्म्स आमदारकीची निवडणूक जिंकले. तसंच त्यानंतर पदवीधर मतदारसंघातूनही एक वेळा ते आमदार झाले होते.

हयातभर पक्षाशी राहिले एकनिष्ठ : डाव्या विचारसरणीच्या चळवळी, आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. या चळवळींमधूनच त्यांचं नेतृत्व झळाळून उठलं. तळागाळाच्या जनतेच्या समस्यांवर शरद पाटील यांनी विधिमंडळ कायम बोलत राहिले. प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचं त्यांच्या विरोधकांनीही कौतुक केलं. मिरज मतदारसंघातून विधानसभेत पोहोचलेले शरद पाटील यांनी 2002 ते 2008 या काळात पदवीधर मतदारसंघाचंही प्रतिनिधीत्व केलं. पदवीधर मतदारसंघातून त्यांनी भाजपाचे उमेदवार प्रकाश जावडेकर यांचा पराभव केला होता. माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांच्या पक्षाशी ते नेहमीच एकनिष्ठ राहिले. जनता दल सेक्युलर या पक्षात त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत ते याच पक्षामध्ये कार्यरत राहिले.

जनता दलाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी लढा : शरद पाटील यांनी आपल्या पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी दिलेल्या लढ्यात त्यांना विधिमंडळातून माजी आमदार संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की आणि प्राध्यापक शरद पाटील यांचीही प्रभावी साथ लाभली. दहावीच्या प्रश्नावर शरद पाटील यांनी नेहमीच आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे अलमट्टी धरणाच्या उंचीच्या मुद्द्यावरसुद्धा त्यांनी थेट कर्नाटक गाठून तिथल्या सरकारशी त्यांनी चर्चा केली होती. या विषयावर चर्चेला शरद पाटील यांनीच पुढाकार घेतला होता.

आजाराशी झुंज अपयशी : गेले काही दिवस कॅन्सरने त्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांना कुपवाड येथील त्यांच्या घरी आणलं होतं. कुपवाड इथं त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी त्याचं निधन झालंय. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडं असा परिवार आहे.

हेही वाचा :

  1. Subrata Roy Passes Away : ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांचं निधन; चार्टर विमानानं लखनौला नेण्यात येणार पार्थिव
  2. Govardhan Sharma Passed Away : सच्चा रामभक्त गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

Last Updated : Dec 27, 2023, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.