ETV Bharat / state

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, दुष्काळी जतलाही तडाखा - miraj rain news

दुष्काळी जत तालुक्यातही गुरुवार दुपारपासून मान्सूनपूर्व पाऊस पडला. पूर्व भागात पावसाची संततधार ही अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षातील हा सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सर्वत्र हा पाऊस सुरूच असल्याने बहुतांशी गावात ओढे,नाले तुडुंब भरून वाहत आहेत.तर वळसंग ते सोर्डी रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे.

monsoon heavy rains in sangli
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
author img

By

Published : May 21, 2022, 1:22 PM IST

सांगली - जिल्ह्यामध्ये गेल्या बारा तासापासून मान्सूनपूर्व पाऊसाने धुंवाधार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः दुष्काळी जत तालुक्यात प्रचंड पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक नाले-ओढे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. काही ठिकाणी छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.
परिणामी वाहतुक सेवा ठप्प झाली आहे. तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर या ठिकाणी प्रचंड पाऊस पडल्याने मंदिर परिसर जलमय बनले.

12 तासापासून पाऊसाची धुंवाधार बॅटिंग - सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊसाची रिपरिप आणि संततधार कायम आहे. जिल्ह्यात तब्बल बारा तासापासून पाऊसाची संततधार कायम आहे.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठा परिणाम शहरी भागात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे.

दुष्काळी तालुक्यालाही पाऊसाने झोडपले - दुष्काळी जत तालुक्यातही गुरुवार दुपारपासून मान्सूनपूर्व पाऊस पडला. पूर्व भागात पावसाची संततधार ही अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षातील हा सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सर्वत्र हा पाऊस सुरूच असल्याने बहुतांशी गावात ओढे,नाले तुडुंब भरून वाहत आहेत.तर वळसंग ते सोर्डी रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे.

गुड्डापूर मंदिर झाले जलमय - तर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर मंदिर जलमय झाले आहे. महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र मधील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असून येथे मुसळधार असा पाऊस पडला आहे. यामुळे गुड्डापुर मंदिर आवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे.यामुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुढघाभर पाणी साचले. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पाण्यातून दंडवत घालून प्रदक्षिणा करावी लागत आहे. तर तीर्थक्षेत्र गुड्डापुर जलमय होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.