सांगली - दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या कवठेमहांकाळ पोलिसांनी आवळल्या आहेत. तीन जणांना अटक करत त्यांच्याकडून चोरीतील नऊ दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आली आहेत.
दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद
कवठेमहांकाळ शहरातल्या जुना एसटी स्टॅन्ड या ठिकाणी कवठेमहांकाळ पोलीसांकडून नाकेबंदी सुरू असताना एका संशयित दुचाकीस्वार निदर्शनास आला. त्याच्याकडे हरियाणा राज्याची पासिंग असलेली दुचाकी आढळून आल्याने पोलिसांचा त्याचवर संशय बळावला, त्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वार निलेश पवार याला या दुचाकीबाबत विचारणा केली असता गाडीचे कागदपत्र नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर निलेश पवार याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता, या दुचाकी त्याने चोरून आणल्याची कबुली दिली. यानंतर निलेश पवार याला अटक करत त्याची कसून चौकशी केली असता आपल्या दोन साथीदारांच्यासमवेत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
साथीदारांसह दुचाकी वाहनांची चोरी
यानंतर पोलिसांनी गणेश पवार आणि अमोल निकम या दोन साथीदारांना अटक करत या तिघांनी चोरलेल्या नऊ दुचाकी हस्तगत केले आहेत. या तिघांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली आहे.
हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेत भाजपाला धक्का, नितीन नवले यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश