ETV Bharat / state

खाकीतील प्रामाणिकपणा; रुग्णालयात गेलेल्या दाम्पत्याचे हरवले दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, पोलिसाने केले परत

सुहास रामचंद्र रोकडे व त्यांच्या पत्नी सुजाता सुहास रोकडे हे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. तपासणीवेळी सुजाता यांचे मंगळसूत्र गळ्यातून काढून सुहास यांनी पॅन्टच्या खिश्यात टाकले होते. खिशातील ओळख पत्र दाखवत असताना नकळत त्यांच्या खिशातून दीड तोळ्यांचे सोन्याच्या साखळीतील मंगळसूत्र खाली पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपले मंगळसूत्र हरवल्याचे लक्षात आले.

Police
मंगळसूत्र परत करताना पोलीस सचिन मोरे
author img

By

Published : May 29, 2020, 4:33 PM IST

सांगली - सध्या चिकुर्डे चेक पोस्ट रोजच्या वादविवादामुळे कुप्रसिद्ध झाली आहे. या चेक पोस्टवर नेहमी शेतकरी व प्रवासी यांच्याकडून पोलीस व आरोग्य विभागाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, गुरुवारी या चेकपोस्टवर खाकीतील माणुसकीचे दर्शन झाले. तपासणी करताना पडलेले दीड तोळ्याचे मंगळसूत्र खाकीतील माणुसकीने परत केले. सचिन मोरे, असे प्रामाणिकपणाने मंगळसूत्र परत करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. सद्या सचिन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

खाकीतील प्रामाणिकपणा; रुग्णालयात गेलेल्या दाम्पत्याचे हरवले दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, पोलिसाने केले परत

शिराळा तालुक्यातील मांगले येथील सुहास रामचंद्र रोकडे व त्यांच्या पत्नी सुजाता सुहास रोकडे हे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. तपासणीवेळी सुजाता यांचे मंगळसूत्र गळ्यातून काढून सुहास यांनी पॅन्टच्या खिश्यात टाकले होते. कोल्हापूरवरुन परत 4 वाजताच्या दरम्यान चिकुर्डे चेक पोस्टवर ते आले. नंतर कुरळप पोलीस ठाण्याचे सचिन मोरे यांना खिशातील ओळख पत्र दाखवत असताना नकळत त्यांच्या खिशातून दीड तोळ्यांचे सोन्याच्या साखळीतील मंगळसूत्र खाली पडले. त्यानंतर 30 मिनिटांनी सचिन यांना ते मंगळसूत्र सापडले.

आपली नैतिक जबाबदारी समजून सचिन यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी वॉट्सअ‌ॅप ग्रुपवर मंगळसूत्र सापडल्याची माहिती शेअर केली. दुसऱ्या दिवशी या रोकडे दाम्पत्याला आपले मंगळसूत्र हरवल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी चेक पोस्टवरील मांगले येथील शिक्षक वैभव तोडकर यांना फोनवरून मंगळसूत्र हरवल्याचे सांगितले.

या शिक्षकांनी कुरळप पोलीस ठाण्याचे सचिन मोरे यांना सापडले असून तुम्ही चेक पोस्टवर येऊन ते घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांना चेक पोस्टवर बोलावून सत्तर हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी रोकडे दाम्पत्याला गहिवरून आले होते, तर सचिन मोरे यांचे आभार मानून देव तुमचे भले करो, असे ही माऊली उद्गार काढत होती. याबाबतची माहिती सर्वत्र पसरल्याने मोरे यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर यावेळी शिक्षक सखाराम पाटील, सचिन जाधव, डॉ. भानुसे, होमगार्ड प्रमोद पाटील, संदीप मेतुगडे, शिक्षक वैभव तोडकर आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.