सांगली- जगात हजारो लाकांचे बळी घेतल्यानंतर आता देशातही कोरोना विषाणूने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात 'जनता कर्फ्यू'ची हाक दिली. गर्दी टाळून कोरोनाचे निर्मूलन व्हावे हे यामागचे उद्धेश होते. पंतप्रधानांच्या या उपक्रमाला सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहरात नागरिकांनी बाहेर जाणे टाळल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण शहर ठप्प झाले असून गल्ली, चौक, रस्ते, सार्वजनिक ठिकाण हे निर्मनुष्य झाल्याचे चित्र आहे. शहरात शुकशुकाट पहायला मिळत आहे. पहा स्तब्ध झालेल्या सांगली शहराचा ड्रोनच्या माध्यमातून 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.
हेही वाचा- कोरोना रोखण्यासाठी १५ दिवस गावे संरक्षित करा - सदाभाऊ खोत