ETV Bharat / state

महिलेच्या संपत्तीत आई-वडिलांनाही मिळावा समान वाटा, सर्वोच्च न्यायालयात याचिका - अॅड. मृणाल बुवा

आजची महिला पुरुषांप्रमाणे काम करते आणि स्वकमाईतुन संपत्ती निर्माण करत आहे. तर महिलेचा लहानपणापासून तिच्या लग्नापर्यंत आई-वडिल सांभाळ करतात. त्यामुळे लग्नानंतर तिने स्वकमाईतून संपत्ती कमावली असेल तर तिच्या मृत्यूपश्चात त्या संपत्तीमध्ये पती, मुले यांच्या बरोबरच महिलेच्या आई-वडिलांनाही समान वाटा मिळावा.

महिलेच्या संपत्तीत आई-वडिलांनाही मिळावा समान वाटा, सर्वोच्च न्यायालयात याचिका
author img

By

Published : Jun 24, 2019, 7:56 PM IST

सांगली - महिलांनी स्वतः कमवलेल्या मालमत्तेमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही समान हिस्सा मिळावा, अशी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मुळच्या सांगलीच्या असणाऱ्या अॅड. मृणाल बुवा आणि त्यांचे पती धैर्यशील साळुंखे यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

मृणाल बुवा आणि धैर्यशील साळुंखे गेल्या काही वर्षांपासून दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. यादरम्यान त्यांच्याकडे एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीबाबतीत एक तक्रार आली होती. ती केस सामंजस्याने सोडवण्यात आली. मात्र, यातून त्यांनी महिला वारसा हक्क या विषयावर अभ्यास करताना, हिंदू महिला वारसा हक्क कायद्यात महिलांच्या मृत्युनंतर तिच्या नावे असणारी संपत्ती तिचे पती, मुले, त्यानंतर सासू-सासरे किंवा सासरच्या अन्य मंडळी आणि यापैकी कोणी नसेल तर आई-वडील असे वाटणीचा क्रम आहेत. मात्र, त्यावेळी महिला कमवती नसल्याने तत्कालीन कायदा आता मात्र नियमबाह्य बनला आहे.

महिलेच्या संपत्तीत आई-वडिलांनाही मिळावा समान वाटा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

कारण आजची महिला पुरुषांप्रमाणे काम करते आणि स्वकमाईतुन संपत्ती निर्माण करत आहे. तर महिलेचा लहानपणापासून तिच्या लग्नापर्यंत आई-वडिल सांभाळ करतात. त्यामुळे लग्नानंतर तिने स्वकमाईतून संपत्ती कमावली असेल तर तिच्या मृत्यूपश्चात त्या संपत्तीमध्ये पती, मुले यांच्या बरोबरच महिलेच्या आई-वडिलांनाही समान वाटा मिळावा, अशी याचिका भारत सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत अॅटर्नी जनरल ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. त्यानुसार येत्या 2 जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून महिलांच्या दृष्टीने त्यांनी कमावलेल्या संपत्तीत, त्यांच्या आई-वडिलांनी केलेला सांभाळ लक्षात घेता, त्यांना समान हिस्सा मिळण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता मृणाल बुवा यांनी व्यक्त केली आहे.

Intro:
सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed Send -file name - MH_SNG_MAHILA_VARSA_KAYADA_ISSUE_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_MAHILA_VARSA_KAYADA_ISSUE_VIS_2_7203751

स्लग - महिलेच्या स्वकमाई संपत्तीत मृत्यू पश्चात्य आई-वडिलांनीही समान वाटयासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका - वकील मृणाल बुवा ..

अँकर - हिंदू महिला वारसा हक्क कायद्यात लवकरच बदल होईल,अशी आशा सुप्रीम कोर्टातल्या वकील मृणाल बुवा यांनी व्यक्त केला आहे.महिलांच्या स्वकमाईच्या मालमत्तेमध्ये तिच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही हिस्सा मिळण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली,असून ऍटॅर्नि जनरल ऑफ इंडिया आणि महिला व बालकल्याण मंत्रालयाला न्यायालयाकडून नोटीस जारी झाल्याची माहिती वकील मृणाल बुवा यांनी दिली आहे.त्या सांगलीमध्ये आले असता बोलत होत्या.Body:
व्ही वो - देशात स्वकमाई करणाऱ्या महिलांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीमधील वाट्यात आता महिलेच्या आई-वडिलांनाही पती,मुलांप्रमाणे वाटा मिळण्याचा मार्ग सोपा होणार आहे. कारण या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या ऍडव्होकेट मनिष बुवा आणि त्यांचे पती धैर्यशील साळुंखे यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली आहे.मृणाल बुवा आणि धैर्यशील साळुंखे गेल्या काही वर्षांपासून दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात वकिली व्यवसाय करत आहेत. त्याच दरम्यान त्यांच्याकडे एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीच्या बाबतीत केस आली होती.ती
सामंजस्याने सोडवण्यात आली.मात्र यातून त्यांनी महिला वारसा हक्क या विषयावर अभ्यास करताना,हिंदू महिला वारसा हक्क कायद्यात महिलांच्या मृत्युनंतर तिच्या नावे असणारी संपत्ती तिचे पती,मुलं,त्यानंतर सासू-सासरे किंवा सासरच्या अन्य मंडळी आणि यापैकी कोणी नसेल तर आई-वडील असे वाटणीचा क्रम आहे.मात्र त्यावेळी महिला कमवती नसल्याने तत्कालीन कायदा आता मात्र नियमबाह्य बनला आहे.कारण आजची महिला पुरुषांच्या प्रमाणे काम करते आणि स्वकमाईतुन संपत्ती निर्माण करत आहे.तर त्या महिलेला लहान पणापासून तिच्या लग्नापर्यंत आई-वडिलांच्या कडून सांभाळ करण्यात येतो, त्यामुळे लग्नानंतर तिने स्वकमाईतून जर संपत्ती कमावली असेल,तर तिच्या मृत्यूपश्चात त्या संपत्ती मध्ये पती, मुलं यांच्या बरोबरच महिलेच्या आई-वडिलांनाही समान वाटा मिळावा अशी याचिका भारत सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करून घेत ऍटॅर्नि जनरल ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाला नोटीस जारी केली आहे. येत्या 2 जुलै रोजी यावर सुनावणी पार पडणार असून सुप्रीम कोर्टाकडून, महिलांच्या दृष्टीने त्यांनी कमावलेल्या संपत्तीत,त्यांच्या आई-वडिलांनी केलेला सांभाळ लक्षात घेता,समान हिस्सा मिळण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता मृणाल बुवा यांनी व्यक्त केला आहे.

बाईट - मृणाल बुवा - वकील ,सर्वोच्च न्यायालय ,दिल्ली.

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.