ETV Bharat / state

राष्ट्रवादी आरक्षणाच्या मुळावर, आघाडीतील ओबीसी नेते बोलघेवडे - पडळकर - ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे आंदोलन

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठा समाजासह ओबीसींच्या मुळावर उठल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. राज्य सरकारमधील ओबीसी नेते हे नुसते बोलघेवडे आहेत. आरक्षणावर लोणावळ्यात बैठक घेण्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा असे देखील त्यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Jun 21, 2021, 7:41 PM IST

सांगली - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठा समाजासह ओबीसींच्या मुळावर उठल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. राज्य सरकारमधील ओबीसी नेते हे नुसते बोलघेवडे आहेत. आरक्षणावर लोणावळ्यात बैठक घेण्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर 26 जून रोजी भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते सांगलीमध्ये बोलत होते.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, राज्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही केंद्र स्थानी असून, फुले- शाहू- आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचाराच्या समाजाच्या मुळावर उठायचे. शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी हे काम करत आहे. जनतेला हे सर्व कळत आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे आंदोलन - पडळकर

माराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सगळ्यांची मागणी आहे, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळावे. ही भाजपाची भूमिका आहे. त्यासाठी येत्या 26 तारखेला भाजप रस्त्यावर उतरणार आहे. माला वाटतं की मंत्र्यांनी लोणावळ्यात बैठक घेण्याऐवजी मंत्रालयात बैठक घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडावा असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी आरक्षणाच्या मुळावर

राष्ट्रवादी कायमच गोपीचंद पडळकरांच्या निशाण्यावर

गोपीचंद पडळकर हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असतात, यातून ते अनेकवेळा वादात देखील सापडले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात लढवली होती. त्यात त्यांचा पराभाव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून पडळकर यांनी राष्ट्रवादीविरोधात टीकेची झोड उठवली आहे. त्याचाच हा आढावा.

पडळकरांचा रोहित पवारांवर निशाणा

रविवारी घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना पोस्टर बॉय म्हटले आहे. रोहित पवार हे स्वत:ला मुख्यमंत्री समजतात अशी टीका पडळकर यांनी पवारांवर केली. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखील पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर नेहमीच पवार कुटुंबावर टीका करत असल्यानेच भाजपाने त्यांना आमदारकी दिल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एका खात्याचा निर्णय दुसराच मंत्री जाहीर करतो. मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर तो मित्र पक्षातील दुसऱ्या मंत्र्याला मान्य नसतो. राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेने आजपर्यंत कधी अनुभवला नव्हता अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर निशाणा

शरद पवारांच्या हस्ते होणाऱ्या अहिल्यादेवी पुतळ्याच्या अनावरणाला विरोध

यापूर्वी जेजुरीमधील अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरणावरून देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान असल्याचे पडळकर यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी जेजुरीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांसह पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा देखील प्रयत्न केला होता. अहिल्यादेवींच्या या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. त्याला विरोध करत पडळकर यांनी पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना - पडळकर

पंढरपूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये गेल्या वर्षी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करून घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचा अशी त्यांची भूमिका आहे." असे विधान पडळकर यांनी केले होते. पडळकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी त्यांच्यावर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ शरद पवारच नाही तर राष्ट्रवादीमधील इतर नेते देखील पडळकर यांच्या निशाण्यावर राहितले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर देखील अनेकवेळा टीका केली आहे.

अजित पवारांचे राजकारण काकांच्या जीवावर - पडळकर

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बोलणं टग्याचं आहे आणि वागणं बाई सारखं आहे, अशी खरमरीत टीका गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर काही दिवसांपूर्वी केली होती. अजित पवारांचे राजकारण चुलत्याच्या जीवावर तर भाजपचं राजकारण बारा बलुतेदार आणि गोरगरीब लोकांच्या पाठींब्यावर आहे. अजित पवार यांचे चालणारे दुकान काही दिवसात बंद पडेल, अशी टीका गोपीचंद पडळक यांनी पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या एका प्रचार सभेत केली होती.

पडळकरांची फक्त राष्ट्रवादीवरच टीका?

दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले. मात्र यातील केवळ एकाच पक्षाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सुरुवातीपासून निशाणा बनवत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - सेरो सर्वेसाठी आयसीएमआरचे पथक बीडमध्ये दाखल, १० गावातील ५०० लोकांची होणार चाचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.