सांगली - जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. 88 मिलिमीटर इतके पावसाची दुसऱ्या दिवशी चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सुरूच असून 18.86 टक्के पाणीसाठी निर्माण झाला आहे. तर वारणा नदी ही पात्राबाहेर गेली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीही वाढ कायम असून सांगली मध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी पात्राता 17 फुटांवर पोहोचली आहे.
24 तासात जिल्ह्यात 14 मिलीमीटर पाऊसाची नोंद - सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे.गेल्या 24 तासात जिल्ह्यात 14 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.तर शिराळा तालुक्यात मात्र धुंवाधार असा पाऊस पडत आहे.गेल्या 24 तासांमध्ये या ठिकाणी 50 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे.24 तासांमध्ये या ठिकाणी 88 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झालेली.त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.34.4 टीएमसी इतकी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणामध्ये आता 18.86 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झालेला आहे.त्यामुळे जवळपास 55 टक्के धरण भरले आहे. तर विद्युत पंपग्रहाच्या कालव्यामधून धरणातून वारणा नदीमध्ये 807 क्युसेकस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तर तालुक्यामध्ये धुंवाधार पाऊस पडत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीमध्येही झपाट्याने वाढ झालेली आहे. त्यामुळे वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे. त्यामुळे वारणाकाठी असणाऱ्या वाळवा आणि शिराळा तालुक्यातली शेकडो एकर शेती, पाण्याखाली गेली आहे. यामध्ये भात,ऊस शेतीसह इतर पिकांमध्ये वारणा नदीचे पाणी शिरले आहे.
कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये देखील संततधार - दुसरे बाजूला कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये देखील संततधार पाऊस कायम आहे.त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे. सांगलीतील आयर्विन पूल या ठिकाणी सध्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी 18 फुटांपर्यंत पोहचली आहे.त्यामुळे सांगलीवाडी बंधारा हा पाण्याखाली गेला आहे.हळूहळू पाण्याची पातळी वाढली असली तरी ती अद्याप पात्रा मध्ये वाढली आहे.त्यामुळे घाबरण्याचे आवश्यकता नाही.
जिल्ह्यात संततधार, वारणा नदी पात्राबाहेर - sangli warna river news
चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.34.4 टीएमसी इतकी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणामध्ये आता 18.86 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झालेला आहे.त्यामुळे जवळपास 55% धरण भरले आहे. तर विद्युत पंपग्रहाच्या कालव्यामधून धरणातून वारणा नदीमध्ये 807 क्युसेकस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तर तालुक्यामध्ये धुंवाधार पाऊस पडत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीमध्येही झपाट्याने वाढ झालेली आहे. त्यामुळे वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे. त्यामुळे वारणाकाठी असणाऱ्या वाळवा आणि शिराळा तालुक्यातली शेकडो एकर शेती, पाण्याखाली गेली आहे. यामध्ये भात,ऊस शेतीसह इतर पिकांमध्ये वारणा नदीचे पाणी शिरले आहे.