ETV Bharat / state

भर दिवसा कोयताने रुग्णवाहिका अन् पानपट्टीची तोडफोड - sangli crime news

सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रुग्णवाहीका व एका पानपट्टीची तोडफोड झाल्याची घटना आज (दि. 4) सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

ambulance
रुग्णालय
author img

By

Published : Mar 4, 2021, 3:24 PM IST

Updated : Mar 4, 2021, 4:07 PM IST

सांगली - भर दिवसा एकाने कोयत्याने रुग्णवाहीका व पानपट्टीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. शासकीय रुग्णालय आवारात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी दादासाहेब कांबळे याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

रुग्णवाहिका अन् पानपट्टी एकाच्याच मालकिचे

सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचा आवारात उभ्या असलेल्या एका रुग्णवाहीका व पानपट्टीची दादासाहेब कांबळे नामक तरुणाने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. अचानकपणे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण पसरले तर या प्रकारानंतर काही विक्रेत्यांना आपली दुकाने तातडीने बंद केली. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत संशयित दादासाहेब कांबळे याला ताब्यात घेतला आहे. पानपट्टी आणि रुग्णालय हे एकाच तरुणाच्या मालकीची असल्याचे समोर आले असून वैयक्तिक कारणातून दादासाहेब कांबळे याने ही तोडफोड केल्याचा प्राथमिक अंदाज विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - पलूसच्या इंगळे पाझर तलावात हजारो माशांचा मृत्यू; पाण्यात विषारी पदार्थ टाकल्याचा संशय

Last Updated : Mar 4, 2021, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.