ETV Bharat / state

सांगलीत १३९ कोरोना रुग्णांची भर; पालिका क्षेत्रातील ११६ जणांचा समावेश - कोरोना वायरस अपडेट सांगली

सांगली जिल्ह्यात मंगळवारी सात जणांचा मृत्यू झाला तर दिवसभरात १३९ रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पालिका क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्ण ९२४ आहेत

Sangli corona update
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 29, 2020, 7:35 AM IST

सांगली - जिल्ह्यात मंगळवारी मोठया संख्येने कोरोनाबाधित वाढले. तब्बल १३९ रुग्णांची भर पडली यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ११६ जणांचा समावेश आहे. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला आणि उपचार घेणारे २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण ९२४ आहेत, तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हदार ८९८ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारीही कोरोना १३९ रुग्णांची वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरज शहरातील ४ , मिरज तालुक्यातील हरिपूर येथील १,पलूस तालुक्यातील खटाव येथील १ ,कवठेमहांकाळ येथील १ अशा ७ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

दिवसभरात जिल्ह्यात तब्बल १३९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे पालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.मंगळवारी दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ११६ जणांना कोरोना लागण झाली आहे. सांगली शहरातील ६२ आणि मिरज शहरातील ५४ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील तालुक्यात आढळलेले कोरोना रुग्ण -
१ ) आटपाडी तालुक्यामधील - ०५
२) जत तालुक्यामधील - ०६
३) खानापूर तालुक्यामधील - ०१
४) मिरज तालुक्यामधील - ०६
५) पलुस तालुक्यामधील - ०२
६) वाळवा तालुक्यामधील - ०१
७) तासगांव तालुक्यामधील - ०३

उपचार घेणारे तब्बल २७ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. डिस्चार्ज देऊन त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. कोरोना उपचार घेणारे ३३ जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील २० जण हे ऑक्सिजनवर तर ११ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर तर २ जण इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत एकूण १ हजार ८९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.यापैकी आज पर्यंत ९१० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६४ जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी ७ हजार ७१७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३ लाख ९१ हजार ४४० वर पोहोचली आहे. दिवसभरात १०३३३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २३२२७७ रुग्ण बरे झाल्याने दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १४४६९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात मंगळवारी १०,३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २,३२,२७७ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.