ETV Bharat / state

Farmer Support To Sharad Pawar: शरद पवारांना शेतकऱ्याचे समर्थन, बेंदूर निमित्ताने बैलावर प्रतिमा साकारत दर्शवला पाठिंबा - Farmer Support To Sharad Pawar

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या तांबवे येथील एका शेतकऱ्याकडूनही (Farmer Support To Sharad Pawar) शरद पवारांचे समर्थन अनोख्या पद्धतीने करण्यात आले आहे. (Image of Sharad Pawar on back of bull) बेंदूर सणाचे औचित्य साधून आपल्या लाडक्या बैलांवर शेतकऱ्याने शरद पवारांची प्रतिकृती साकारत "आम्ही साहेबांच्या सोबत" असा मजकूर लिहून शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. (Bendur festival)

Farmer Support To Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Jul 4, 2023, 7:30 PM IST

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फुटीनंतर शरद पवारांचे समर्थन करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. (Farmer Support To Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार व अनेक नेते भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर राज्यभरात शरद पवारांच्या सोबत कोण-कोण असणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. (Image of Sharad Pawar on back of bull) शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी आमदार, नेते, राष्ट्रवादी कार्यकर्ते व त्यांचे समर्थक आपल्या परीने गावामध्ये, मतदारसंघांमध्ये "आम्ही पवार साहेबांच्या सोबत" असल्याची फलक उभारत आहेत. (Bendur festival)

बैलांच्या पाठीवर शरद पवारांचे चित्र : तर शरद पवारांना वेगळ्या पद्धतीने समर्थन वाळवा तालुक्यातल्या तांबवे येथील शेतकरी आनंदराव गावडे यांनी दिले आहे. तांबवे येथील शेतकरी आनंदराव गावडे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्ते देखील आहेत. आनंदराव गावडे यांनी बेंदूर सणाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बैलांच्या माध्यमातून शरद पवारांचे समर्थन केले आहे. गावडे यांची कॅप्टन आणि पल्सर हे दोन बैल आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी बेंदूर सणाच्या निमित्ताने या बैलांना सजवलं होतं आणि हे करत असताना आपण शरद पवारांच्या सोबत असल्याचा दाखवण्याचा प्रयत्नही त्यांनी यावेळी केला आहे.

पवारांसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्धार : आपल्या दोन्ही लाडक्या बैलांच्या अंगावर शरद पवारांची प्रतिकृती साकारली आहे. त्याचबरोबर "आम्ही साहेबांच्या सोबत"असल्याचा मजकूर बैलांच्या अंगावर लिहिला आहे. तर दुसऱ्या बाजूला विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. दोन्ही बैलांच्या अंगावर अशाच पद्धतीने शरद पवारांची प्रतिकृती आणि मजकूर लिहून आपण शरद पवार यांच्या सोबतच ठामपणे उभे राहण्याचा निर्धार शेतकरी आनंदराव गावडे यांनी दर्शवला आहे. गावडे यांनी शरद पवारांच्या प्रति असणारी निष्ठा, बेंदूर सणाच्या निमित्ताने आपल्या बैलांच्या रूपाने दाखवून दिली आहे. आनंदराव गावडे यांच्या अनोख्या पद्धतीच्या समर्थनाची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडानंतर कोणाकडे किती आमदार?; वाचा सविस्तर
  2. Maharashtra Political Crisis : 'देशाला मोदींशिवाय पर्याय नाही', पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
  3. Maharashtra Political Crisis : शरद पवारांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावंताची जिरणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.