ETV Bharat / state

कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात वृध्द महिला जागीच ठार - pune bangalore highway women death

कलावती नारायण कणसे (वय ८०) असे मृत वृध्देचे नाव आहे. तर नारायण कणसे, शुभांगी कणसे, सोनाली कणसे, दिव्या कणसे, शिवम कणसे अशी जखमींची नावे आहेत. कणसे कुटुंबीय मंगळवारी सकाळी एमएच १२ सी.वाय.२७१९ मधून जोतिबा दर्शनाला गेले होते. ते सायंकाळी गावाकडे परतत होते.

old women died in car accident in pune bangalore highway
कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात वृध्दा जागीच ठार, पाच जखमी
author img

By

Published : Dec 30, 2020, 7:42 AM IST

सांगली - पुणे-बंगळुरू महामार्गावर वाघवाडी फाटा येथील बॉम्बे रेऑन समोर कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला सातारा जिल्हयातील अंगापूरची रहिवासी आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले. एकाच कुटुंबातील हे सर्व जण जोतिबाचे दर्शन घेऊन गावी परतत असताना मंगळवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

कलावती नारायण कणसे (वय ८०) असे मृत वृध्देचे नाव आहे. तर नारायण कणसे, शुभांगी कणसे, सोनाली कणसे, दिव्या कणसे, शिवम कणसे अशी जखमींची नावे आहेत. कणसे कुटुंबीय मंगळवारी सकाळी एमएच १२ सी.वाय.२७१९ मधून जोतिबा दर्शनाला गेले होते. ते सायंकाळी गावाकडे परतत होते. दरम्यान वाघवाडी फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून ही कार रोड दुभाजकावर जावून आदळली. यामध्ये कलावती कणसे या गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या. परिसरातील लोकांनी जखमींना उपचारासाठी हलवले. याप्रकरणी विनायक सुभाष कणसे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

हेही वाचा - आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये टीम इंडियाची भरारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.