ETV Bharat / state

Old Man Murder : 80 वर्षांच्या वृद्धाचा खून करत गळफास लावून आत्महत्येचा बनाव - वृद्ध व्यक्तीचा खून

इस्लामपूर येथे एक 80 वर्षांच्या वृद्धाचा खून (Old Man Murder) करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खुनाच्या घटनेनंतर गळफास लावून आत्महत्येचा बनाव (show faked suicide by hanging) केल्याचा समोर आला आहे. Latest news from Sangli, Sangli Crime

Old Man Murder
वृद्धाचा खून करत गळफास लावून आत्महत्येचा बनाव
author img

By

Published : Nov 14, 2022, 10:25 PM IST

सांगली : इस्लामपूर येथे एक 80 वर्षांच्या वृद्धाचा खून (Old Man Murder) करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खुनाच्या घटनेनंतर गळफास लावून आत्महत्येचा बनाव (show faked suicide by hanging) केल्याचा समोर आला आहे. याप्रकारे इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली असून नेमका हा खून कोणी आणि कोणत्या कारणातून केला हे आद्यप समजू शकले नाही. Latest news from Sangli, Sangli Crime

वृद्धाच्या डोक्यात घाव घालून हत्या- इस्लामपूर शहरातल्या पेठकर कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या हंबीरराव साळुंखे या वृद्धाचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. डोक्यामध्ये वर्मी घाव घालून आधी हत्या करण्यात आली. त्यानंतर सुताच्या दोरीने हंबीरराव साळुंखे यांना लटकवून, साळुंखे यांनी गळफास घेऊन ही आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी गाव घेत पंचनामा केला असता हा प्रकार समोर आला आहे.

हत्येचे कारण अज्ञात- हंबीरराव आणि त्यांच्या पत्नी हे दोघेच या ठिकाणी राहतात. दोन दिवसांपूर्वीच पत्नी या बाहेरगावी गेल्या होत्या. या दरम्यान हंबीरराव साळुंखे घरी एकटे असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज इस्लामपूर पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणी केली? आणि कोणत्या कारणातून केली? हे समजू शकले नाही. याबाबत इस्लामपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे इस्लामपूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.