ETV Bharat / state

जुन्या नोटांचा गोरखधंदा अजुनही सुरू, सांगलीत सापडल्या १ कोटींच्या नोटा

सातारच्या कराड येथील दीपक बाकले आणि सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील रमेश पाटील यांनी या नोटा दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या नोटा कोणाच्या मालकीच्या आणि त्या बदलण्यासाठी कोणाकडे देण्यात येत होत्या ? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा
author img

By

Published : May 4, 2019, 1:49 PM IST

सांगली - सांगलीच्या इस्लामपूर मध्ये तब्बल १ कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. जुन्या नोटा बाद होऊन दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही या नोटा सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जुन्या नोटांचे पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. १ कोटींचे मूळ मालक आणि एजंटपर्यंत पोलीस पोहोचतील, असा विश्वास सांगली पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जुन्या नोटा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली

सांगलीच्या इस्लामपूर मध्ये ३ दिवसांपूर्वी तब्बल १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. पण १ कोटींच्या या हजार पाचशेच्या जुन्या नोटा पाहून पोलीस दलही चक्रावून गेले. अजूनही या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात असून, चक्क त्यांचा बाजारही सुरू असल्याने यामागे मोठी साखळी असल्याचा संशय वाढला आहे. कारण नोटा घेऊन आलेल्या तीन जणांकडे केवळ बदलण्याची जवाबदारी होती.

सातारच्या कराड येथील दीपक बाकले आणि सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील रमेश पाटील यांनी या नोटा दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या नोटा कोणाच्या मालकीच्या आणि त्या बदलण्यासाठी कोणाकडे देण्यात येत होत्या ? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. एक कोटींच्या बदल्यात २५ लाख मिळणार होते, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे या जुन्या नोटा घेऊन, त्याचे पुढे काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

इस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणी गतीने तपास सुरू केला आहे. वाळवा तालुक्यातील एक बड्या हस्तीचे हे पैसे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या मागील सुत्रधाराचा शोध लवकरच लागले, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send - file name - R_MH_1_SNG_04_MAY_2019_OLD_CURRENCY_ISSUE_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_4_SNG_04_MAY_2019_OLD_CURRENCY_ISSUE_SARFARAJ_SANADI

स्लग - २ वर्षे उलटूनही जून्या नोटांचा गोरखधंदा सुरूच , १ कोटींच्या जुन्या नोटाच्या मुळाशी पोहचण्याचे पोलिसांसमोर आव्हान .

अँकर - जुन्या नोटा बदलण्याचा गोरखधंदा २ वर्षे उलटूनही सुरूच आहे.आणि मोठ्या प्रमाणात काळा पैसा अजून शिल्लक असल्याचे समोर येत आहे.सांगलीच्या इस्लामपूर मध्ये तब्बल १ कोटींच्या जुन्या नोटा सापडल्याने राज्यात खळबळ माजली आहे.यामुळे या जुन्या नोटांचे पाळे-मोळ खणून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून १ कोटींचे मूळ मालक आणि एजंटच्या पर्यंत पोलीस पोहचतील असा विश्वास सांगली पोलिसांनी व्यक्त केला आहे.Body:
व्ही वो - दोन वर्षे उलटूनही चालनातुन बंद झालेल्या जुन्या नोटा बदलण्याचा गोरखधंदा सुरू आहे.सांगलीच्या इस्लामपूर मध्ये ३ दिवसांपूर्वी तब्बल १ कोटी रुपयांच्या जुना नोटा सापडल्या.नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून हा प्रकारे उघडकीस आणला होता.पण १ कोटींच्या या हजार पाचशेच्या जुन्या नोटा पाहून पोलीस दलही चक्रावून गेले.
अजूनही या नोटा त्याही एवढ्या मोठ्या प्रमाणात असून चक्क त्यांचा बाजारही सुरू असल्याने यामागे मोठी साखळी असल्याचा संशय वाढला आहे.कारण नोटा घेऊन आलेले तीन जणांच्याकडे केवळ बदलण्याची जवाबदारी होती.
सातारच्या कराड येथील दीपक बाकले आणि सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील रमेश पाटील यांनी या नोटा दिल्याची माहिती समोर आली आहे.मात्र या नोटा कोणाच्या मालकीच्या आणि त्या बदलण्यासाठी कोणाकडे देण्यात येत होत्या ? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.तर एक कोटींच्या बदल्यात २५ लाख मिळणार होते,अशी माहिती समोर आली आहे.यामुळे या जुन्या नोटा घेऊन ,त्याचे पुढे काय ? असाही प्रश्नही निर्माण झाला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणी गतीने तपास सुरू केला आहे.वाळवा तालुक्यातील एक बड्या हस्तीचे हे पैसे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.तर पोलिसांनी यामध्ये सूत्रधार कोणा आहे.याच्या तळाशी जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.पण तब्बल २ वर्षे उलटूनही जुन्या नोटांचा हा बाजार सुरू आहे,याबाबत सर्व सामान्या लोकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बाईट - शशिकांत बोराटे - अप्पर पोलीस अधीक्षक , सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.