सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 8 दिवसांपासून हजारांच्यावर असणारी रुग्णसंख्या गुरुवारी 2 हजारच्या पुढे गेली होती. एका दिवसात तब्बल 2 हजार 328 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी ही वाढ कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी रुग्ण संख्येची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही 2 हजाराच्या पुढे गेल्याने प्रशासन हादरून गेले आहे. तर शुक्रवारी एकाच दिवसात 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी -
जिल्ह्यात दिवसभरात 2,046 कोरोना ररुग्णांची नोंद झाली असून 45 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 87 हजार 693 एवढी झाली आहे. तर 1,169 जण कोरोना मुक्त झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 16,734 एवढी आहे.
हेही वाचा - कोरोनाने संकट; सुमारे १५.२० कोटी लोकांचा अन्न असुरक्षेबरोबर सामना