सांगली - पावसामुळे आलेल्या पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे पंचनामे करण्यात आले आहेत कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही तसेच ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत Chief Minister Eknath Shinde visit to Sangli अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे विटा येथे शिवसेनेचे शिंदगटाचे आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते
पुरामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची विटा या ठिकाणी घरी भेट दिली आहे नुकतेच अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन झाले या पार्श्वभूमीवर बाबर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी स्वर्गीय शोभा बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली तसेच आमदार अनिल बाबर व कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुरामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे
कोणतीही अडचण येणार नाही कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही सरकार त्याबबाबतीत दक्ष आहे तसेच पुराच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन करण्यात आलेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची सर्व दक्षता घेण्यात आली आहे तशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूर परिस्थिती आणि नुकसानीच्या बाबतीत विभागीय आयुक्तांकडून माहिती घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे
जनहिताचे किती निर्णय घेतलेत ते बगा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ध्वजारोहण हे बिन खात्याच्या मंत्र्यांकडून होणार असल्याच्या केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले विरोधकांना टीका करू द्या आम्ही महिन्याभरात जनहिताचे किती निर्णय घेतलेत ते बगा असा टोला जयंत पाटलांना लगावला आहे
हेही वाचा लाल सिंग चड्ढा चित्रपटावरील बहिष्काराबद्दल पाहा काय म्हणाले अजित पवार