ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणी एनआयएचे सराफांना समन्स.. पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील सराफ व्यावसायिक एनआयएच्या रडारवर आहेत. एनआयएकडून काही सराफांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

NIA summons goldsmiths
आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरण
author img

By

Published : Dec 23, 2020, 4:40 PM IST

सांगली - आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील सराफ व्यावसायिक एनआयएच्या रडारवर आहेत. एनआयएकडून काही सराफांना नोटीसा बजावण्यात आल्या असून विटा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोने तस्करीचे खानापूर कनेक्शन -

तीन महिन्यापूर्वी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी 83 किलो सोन्याचे बिस्किट डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) जप्त केली होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आठ जण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील असल्याचे समोर आले होते. रवीकिरण गायकवाड, पवन कुमार गायकवाड, योगेश हणमंत रुपनर, अभिजित बाबर, सद्दाम पटेल, अवधूत अरुण विभूते, सचिन आप्पासो हसबे, दिलीप लक्ष्मण पाटील या आरोपींचा समावेश आहे.

एनआयएकडून दोन वेळा छापे -

दरम्यान तपासामध्ये आसाम राज्यातील गुवाहाटीवरून बोगस आधारकार्डद्वारे प्रवास करून दिल्लीमध्ये आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने या सोने तस्करीचा तपास हा राष्ट्रीय तपास एजन्सीकडे देण्यात आला होता.
तर या सोने तस्करी प्रकरणी "एनआयए"कडून सांगली जिल्ह्यामध्ये दोन महिन्यापूर्वी दिघंची या ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर खानापूर तालुक्यातील जाधववाडी याठिकाणी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा छापे टाकत काही लोकांची एनआयएच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे.

एनआयएकडून सराफ व्यवसायिकांना समन्स -

त्यानंतर एनआयएच्या रडारवर खानापूर तालुक्यातील सराफ व्यवसायिक आले आहेत. तपासाच्या पार्श्‍वभूमीवर एनआयएकडून विट्यासह खानापूर तालुक्यातील काही सराफ व्यवसायिकांना सोने तस्करी प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहेत आणि 26 डिसेंबर रोजी विटा पोलीस ठाण्यात हजर राहून आपले म्हणणे मांडायचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी एनआयएचे पथक विट्यात दाखल झाले आहे. तर एनआयएच्या नोटीसमुळे खानापूर तालुक्यातल्या सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.