सांगली- राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११६ वर पोहोचली असून राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आपले बांधव मृत्यूशी झुंज देत असताना आपण पुरणपोळी खाऊन आनंदात गुढी पाडवा साजरा करणे हे चुकीचे आहे, या विचारातून वाळवा तालुक्यातील लाडेगाव येथील नागरिकांनी गुढी उभारण्यास टाळले आहे.
जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये करोनाचे ४ रुग्ण आढळले आहे आणि यामुळे इस्लामपूर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे, परिस्थिती पाहून लाडेगावचे सरपंच रणधीर पाटील यांनी गावकऱ्यांना गुढी पाडवा न साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. त्याचबरोबर, गावातील नागरिकांनी आपापल्या घर परिसरातील स्वच्छता करून सुरक्षित राहण्याचा संदेश दिला आहे.
हेही वाचा- सांगली पालिका क्षेत्रात 18 ठिकाणी भाजीपाला केंद्र; नियमित 'या' वेळेत राहणार सुरू