ETV Bharat / state

महिलांप्रती नकारात्मक मानसिकता बदलल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत - विजया रहाटकर - राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून आज (4 जानेवारी) 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचा जनसुनावणी कार्यक्रम पार पडला. यावेळी, कितीही कायदे केले तरी, जोपर्यंत समाजाची महिलांप्रति नकारात्मक मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.

rahatkar
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
author img

By

Published : Jan 4, 2020, 5:34 PM IST

सांगली - महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी अनेक कायदे आहेत. मात्र, कितीही कायदे केले तरी, जोपर्यंत समाजाची महिलांप्रति नकारात्मक मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून आज (4 जानेवारी) 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचा जनसुनावणी कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी रहाटकर बोलत होत्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

केंद्र सरकारच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू झालेल्या 'सखी वन स्टॉप सेंटर'च्या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन विजया रहाटकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना रहाटकर म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी 'सखी वन स्टॉप सेंटर' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज देशात 500हून अधिक सेंटर सुरू झाले असून 1 हजार सेंटरचे उद्देश्य ठेवण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून अत्याचार पीडित महिलेसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून तिला न्याय देण्यात येणार आहे"

हेही वाचा - आता पुण्यात लवकरच दिसणार 'महिला रिक्षाचालक'

'महिला आयोग आपल्या दारी' या कार्यक्रमाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यानिमित्ताने महिला तक्रार दाखल करण्याला धजावत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच महिला आयोगाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी सुरू केलेल्या महिला डिजिटल साक्षरता उपक्रमाविषयीही त्यांनी यावेळी माहिती दिली. याप्रसंगी सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Intro:
File name -mh_sng_02_rahatkar_on_mahila_atyachar_vis_01_7203751 - to - mh_sng_02_rahatkar_on_mahila_atyachar_byt_04_7203751

स्लग - कितीही कायदे करा,पण महिलांच्या प्रति नकारात्मक मानसिकता बदलल्या शिवाय अत्याचार थांबणार नाही - राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर..

अँकर - महिला अत्याचार थांबवण्यासाठी अनेक कायदे आहेत,मात्र कितीही कायदे केले तरी, जोपर्यंत समाजाची महिलांच्या प्रति नकारात्मक मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत,असे स्पष्ट मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे.सांगली मध्ये आयोजित 'राज्य महिला आयोग आपल्या दारी' या जनसुनावणी प्रसंगी त्या बोलत होत्या.Body:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून“महिला आयोग आपल्या दारी”या उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी कार्यक्रम आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा,श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सुनावणीला सुरवात झाली.यानिमित्ताने केंद्र सरकारच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू झालेल्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना विजया राहटकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी "सखी वन स्टॉप सेंटर'हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.आणि आज देशात 500 हुन अधिक सेंटर सुरू झाले आहेत,आणि 1 हजार सेंटरचे उद्देश आहे.या सेंटरच्या माध्यमातून अत्याचार पीडित महिलेले एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून तिला न्याय देण्याचा उद्देश असल्याचे राहटकर यांनी स्पष्ट केले.तसेच राज्य महिला आयोगाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "महिला आयोग आपल्या दारी" जनसुनावणीला चांगला प्रतिसाद राज्यभर मिळत आहे, आणि महिला मोठ्या हिंमतीने पुढे येऊन आता तक्रारी देऊ लागल्या आहेत. पण महिलांच्यावरील अत्याचारात वाढ कायम आहे,आणि यासाठी कितीही कायदे आणले तरी काही होणार नाही,कारण समाजात आजही महिलांच्या बद्दल नकारात्मक मानसिकता आहे , तसेच महिलांना दुय्यम वागणूक देण्यात येत आहे, त्यामुळे समाजाने महिलांच्या प्रति नकारात्मक मानसिकता बदलने गरजेचे असल्याचे मत राहटकर यांनी व्यक्त केली आहे.

तसेच आज महिलांच्याबद्दल सायबर गुन्ह्यात मोठी वाढ होताना दिसत आहेत,सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अनेक प्रकार घडत आहेत.आणि ही गंभीर बाब असल्याने राज्य महिला आयोगाने महिलांच्यासाठी डिजिटल साक्षरता उपक्रम सुरू केला आहे.आणि याला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विजया राहटकर यांनी स्पष्ट केले आहे.

बाईट - विजया रहाटकर - अध्यक्षा ,राज्य महिला आयोग,महाराष्ट्र .
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.