ETV Bharat / state

...म्हणून पंढरपुरात पराभव झाला, जयंत पाटलांनी दिली कबुली

'पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये विसंवाद आणि तालुक्यातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे या निवडणुकीत आमचा पराभव झाला', असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

sangli
सांगली
author img

By

Published : May 2, 2021, 7:32 PM IST

सांगली - 'पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये विसंवाद आणि तालुक्यातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे पराभव झाला', अशी कबुली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते.

विसंवाद आणि तालुक्यातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात अपयशी ठरलो - जयंत पाटील

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. भाजपच्या समाधान अवताडे यांनी महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'मंगळवेढा पोटनिवडणूक ही पंढरपूर आणि मंगळवेढा या 2 तालुक्यातील होती. त्यामुळे त्याठिकाणी दोन्ही तालुक्यात सुसंवाद होऊ शकला नाही. दोन्ही तालुक्यांना आम्ही बरोबर घेऊन जाण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे या निवडणुकीत आमचा पराभव झाला. तसेच, केरळ राज्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली. ज्यामध्ये 2 ठिकाणी आम्हाला यश मिळाले आहे', असे जयंत पाटलांनी म्हटले आहे.

समाधान आवताडेंची 3 हजार 733 मतांनी बाजी

दरम्यान, भाजपच्या समाधान अवताडे यांना ईव्हीएम व टपाली 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांना एकूण 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. समाधान अवताडे यांनी 3 हजार 733 मतांनी बाजी मारली आहे.

हेही वाचा - अदर पूनावाला यांना धमकी कोणी दिली; जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; 5 जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.