ETV Bharat / state

..यांच्या रुपाने महाराष्ट्राला आर. आर. आबांचे कर्तृत्व मिळेल - शरद पवार - jayant patil

रोहित पाटील यांच्या रुपाने महाराष्ट्राला येणाऱ्या काळात दिवंगर आर. आर. पाटील यांचे कर्तृत्व मिळेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शरद पवार
author img

By

Published : Sep 1, 2019, 11:58 PM IST

सांगली - रोहित पाटील यांच्या रुपाने महाराष्ट्राला येणाऱ्या काळात दिवंगर आर. आर. पाटील यांचे कर्तृत्व मिळेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज आर आर पाटील यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व रोहित पाटील करेल असे पवार म्हणाले.

२०२४ ला रोहित पाटील हेच आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने २०२४ मधील विधानसभेचे उमेदवार म्हणून रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटल यांनी घोषणा केली. तसेच २०२४ मध्ये रोहित पाटील हे तासगावचे आमदार असतील असाही दावा त्यांनी केला. त्यांनी केलेल्या या घोषणेवर खुद्द शरद पवारांनी शिक्कामोर्तब केला.

रोहित पाटलांच्या रुपाने महाराष्ट्राला आर. आर. आबांचे कर्तृत्व मिळेल - शरद पवार

आर.आर. पाटील या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणारं असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहिल. मात्र, त्यांचा पुतळा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देईल आणि पुढील ५ वर्षानंतर रोहित पाटील यांच्या रुपाने महाराष्ट्राला येणार्‍या काळात आबांचे कर्तृत्व मिळेल, असेही पवार यावेळी म्हणाले.

रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणाने उपस्थित सर्वांना आबांची आठवण आली होती. प्रत्येक वक्त्यांनी आपल्या भाषणात रोहित पाटील यांची भाषणशैली आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

आपल्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा ठसा आर आर पाटील यांनी निर्माण केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुलुख मैदानी तोफ, आधुनिक गाडगे महाराज, संसदपटू अशा अनेक बिरुदावली त्यांच्या नावापुढे लागायच्या. आबांच्या रुपाने अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात स्थान निर्माण करणारे नेतृत्व हरपलं. मात्र, आता आर. आर. पाटील यांचे हरपलेले नेतृत्व त्यांच्या मुलाच्या रूपाने पुढे येत आहे. आबांप्रमाणे वक्तृत्वशैली असणाऱ्या रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तासगावमध्ये लॉंचिंग केले. आज त्यांच्याभोवती हजारो तरुणांचा गराडा होता.

Intro:File name - mh_sng_05_jun_rr_patil_vis_01_7203751 - mh_sng_05_jun_rr_patil_vis_04_7203751

स्लग - रोहित पाटीलच्या रुपाने महाराष्ट्राला येणार्‍या काळात आबांचे कर्तृत्व मिळेल - शरद पवार ..

अँकर - दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचे आज दिमाखात राजकारणात दमदार एंट्री झाली आहे.आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 2024 मधील विधानसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केली आहे.प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांनी केलेल्या या घोषणेवर खुद्द शरद पवारांनी शिक्कामोर्तब करत उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व रोहीत पाटील असेल असंही जाहीर केले..Body:आपल्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा नाव आर आर पाटील यांनी निर्माण केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुलुख मैदानी तोफ ,आधुनिक गाडगे महाराज, संसदपटू अशा अनेक बिरुदावली त्यांच्या नावापुढे लागायच्या,अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात स्थान निर्माण करणारे नेतृत्व हरपलं.मात्र आता आर आर पाटील यांचे हरपलेले नेतृत्व त्यांच्या मुलाच्या रूपाने पुढे येत आहे.आबां प्रमाणे वक्तृत्वशैली असणाऱ्या रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तासगाव मध्ये आर आर पाटील यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने लॉंचिंग केले आहे. हजारो तरुणांचे गराडा,जल्लोषपूर्ण
मिरवणूक अशा वातावरणात रोहित पाटील यांची आज खऱ्या अर्थाने राजकारणात दमदार एन्ट्री झाली आहे.तर सोहळ्यानिमित्त रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणाने उपस्थित सर्वांना आबांची आठवण आली होती.आणि प्रत्येक वक्त्यांनी आपल्या भाषणात रोहित पाटील यांचे भाषणशैली प्रति आर आर पाटील प्रमाणे असल्याचा आवर्जून उल्लेख केला.आणि या सर्वांचा औचित्य साधून राष्ट्रवादीने रोहित पाटील यांना उमेदवारी सुद्धा जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी 2024 मध्ये तासगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार हे रोहित पाटील असतील असं शरद पवारांच्या उपस्थितीत घोषित करून टाकलं.आणि 2024 मध्ये रोहित पाटील हे तासगावचे आमदार रोहित पाटील असतील असा दावा केला.

बाईट - जयंतराव पाटील - प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

व्ही वो - शरद पवार यांनी आपण स्वर्गीय आर.आर.आबा या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणार आहे. आणि आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहिल.मात्र त्यांचा पुतळा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देईल आणि पुढील पाच वर्षानंतर रोहित पाटील याच्या रुपाने महाराष्ट्राला येणार्‍या काळात आबांचे कर्तृत्व मिळेल,असे प्रतिपादन करत जयंतराव पाटील यांनी जाहीर केलेल्या रोहित पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

बाईट - शरद पवार - नेते , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.