ETV Bharat / state

सत्तेत भाजपने नैतिकता पाळली होती का ? - अमोल कोल्हे - खासदार अमोल कोल्हे न्यूज

नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना नैतिकता पाळली होती का,असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपला लगावला आहे.

खासदार अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हे
author img

By

Published : Jan 14, 2021, 2:05 AM IST

सांगली - राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करा, या मागणीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत, अशी टीका खासदार कोल्हे यांनी केली आहे. ते म्हैसाळ येथे बोलत होते.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारासाठी सांगलीच्या म्हैसाळ याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सभा घेतली. यासभेच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना खासदार कोल्हे यांनी भाजपवर विविध मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

सत्तेत भाजपने नैतिकता पाळली होती का ? - अमोल कोल्हे

हेही वाचा-विशेष : RBI चे महाराष्ट्रातील अनेक बँका व पतसंस्थांवर आर्थिक निर्बंध, त्यात वसंतदादा बँकेची भर

आम्हाला आता शिव-शंभू भक्ती शिकवणार का ?

खासदार कोल्हे म्हणाले की, महत्वाचा मुद्दा हा आहे की, छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या प्रत्येकासाठी आराध्य दैवत आहेत. हा मुद्दा कोण उचलतेय याचे मला अप्रूप वाटत आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले. ज्यांनी महाराजाच्या गडकोटावर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जीआर काढला हे लोक आम्हाला आता शिव-शंभू भक्ती शिकवणार का ? असा संतप्त सवाल कोल्हे यांनी केला. मात्र 5 वर्षे सत्तेत असताना यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल काय केले, असा प्रश्न विचारले पाहिजे, असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी - फडणवीस

सत्तेत असताना नैतिकता पाळली होती का ?

बलात्काराच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. त्याबाबत बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की, आरोप झाला म्हणजे तो सिद्ध होत नाही. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीत स्वतः नार्को टेस्टची मागणी केली आहे. त्यामुळे ज्यांनी आरोप केले, त्यांनी नार्को टेस्टसाठी पुढाकार घ्यावा. पण ती होत नाही. आमदार मुंडे यांनी त्यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पण जे विरोधक आज राजीनाम्याची मागणी करत आहेत, त्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत. त्यांनी जर आरशात बघितले, तर त्याच्या मागण्या रास्त ठरतील,असे वाटत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक नैतिकतेची अपेक्षा आमच्याकडून करतात. तेवढी नैतिकता विरोधकांनी सत्तेत असताना पाळली होती का, असा सवाल खासदार कोल्हे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.