ETV Bharat / state

जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.20 टक्के मतदान.. - निवडणूक मतमोजणी

जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंदाजे 80.20 टक्के मतदान झाले आहे. सोमवारी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात आता सोमवारचीच उत्सुकता लागून राहिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.20 टक्के मतदान..

author img

By

Published : Jan 16, 2021, 6:26 AM IST

Updated : Jan 16, 2021, 8:46 AM IST

  • सांगली - जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. अंदाजे सरासरी 80.20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले.

    चुरशीने पार पडले मतदान..

    जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर 10 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे 142 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. अत्यंत चुरशीने या निवडणुकीसाठी प्रचार पार पडला. दुरंगी-तिरंगी अशी लढत या निवडणुकीत झाली आहे.
    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.20 टक्के मतदान..

    3 लाख 13 हजार 376 मतदारांनी बाजवला हक्क..

    1 हजार 508 जागांसाठी तब्बल 3 हजार 76 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले आहे. जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 662 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजल्या पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीत 3 लाख 13 हजार 376 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून अंदाजे सरासरी 80.20 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली झाली. तर सदरची टक्केवारी ही अंदाजित असून एकूण आकडेवारीचा ताळमेळ घेतल्यानंतर अंतिम टक्केवारी बद्दल माहिती दिली जाईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

    गाव कारभाऱ्यांचे भवितव्य 18 जानेवारीला ठरणार..

    गाव कारभारी कोण असणार याचा कल शुक्रवारी ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाला. आता 18 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर गावचे कारभारी कोण? हे स्पष्ट होणार आहे.

    एक नजर तालुकानिहाय अंदाजित मतदान व टक्केवारी..

    मिरज एकूण ग्रामपंचायती २२, झालेले मतदान ९१ हजार ७९४ (७८.४५ टक्के).

    तासगाव एकूण ग्रामपंचायती ३६, झालेले मतदान ७६ हजार ५७७ (७९.८१ टक्के).

    कवठेमहांकाळ एकूण ग्रामपंचायती १०, झालेले मतदान १३ हजार ९५ (८३.६८ टक्के).

    जत एकूण ग्रामपंचायती २९, झालेले मतदान ४७ हजार ५९६ (८३.३८ टक्के).

    आटपाडी एकूण ग्रामपंचायती ९, झालेले मतदान १३ हजार ६७७ (७७.७९ टक्के).

    विटा एकूण ग्रामपंचायती ११, झालेले मतदान १५ हजार ३५७ (७६.११ टक्के).

    पलूस एकूण ग्रामपंचायती १२, झालेले मतदान ३३ हजार ४४८ (८२.६० टक्के).

    कडेगाव एकूण ग्रामपंचायती ९, झालेले मतदान १५ हजार ७६९ (८०.३६ टक्के).

    वाळवा एकूण ग्रामपंचायती २, झालेले मतदान २ हजार ५४० (८५.८७ टक्के).

    शिराळा एकूण ग्रामपंचायती २, झालेले मतदान ३ हजार ५२३ (८३.०७ टक्के).

Last Updated : Jan 16, 2021, 8:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.