ETV Bharat / state

दोन लाखांच्या बनावट दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त, 24 तासांत दुसरी कारवाई

मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील विजयनगर येथे सापळा रचून तब्बल सव्वा दोन लाखांच्या विदेशी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. मागील 24 तासांतील अवैद्य दारू तस्करीची ही दुसरी मोठी कारवाई मिरज तालुक्यात झाली आहे.

जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : May 30, 2021, 7:19 PM IST

Updated : May 30, 2021, 8:12 PM IST

सांगली - मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील विजयनगर येथे सापळा रचून तब्बल सव्वा दोन लाखांच्या विदेशी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. मागील 24 तासांतील अवैद्य दारू तस्करीची ही दुसरी मोठी कारवाई मिरज तालुक्यात झाली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोव्यातून चोरट्या मार्गाने मिरज तालुक्यातील मालगाव याठिकाणी ही गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

बोलताना पोलीस उपअधीक्षक

सव्वादोन लाखांचा विदेश दारूसाठा जप्त

मिरज-म्हैसाळ मार्गावरील विजयनगर या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून गोवा बनावटीचा विदेशी दारू साठा जप्त केली आहे. गोव्यातून चोरट्या मार्गाने ही गोवा बनावटीची विदेशी दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिरज पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका संशयित मोटारीचा पाठलाग करत वाहन पकडले असता, त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डची गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली. 2 लाख 12 हजारांचा विदेशी दारुसाठा आणि चारचाकी मोटारसह सात लाख 17 हजारांचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी यावेळी जप्त केला. दरम्यान, या कारवाई वेळी गाडीतील तीन जण हे पसार झाले. मात्र, गाडी चालकाला पकडण्यात पोलिसांनी यश आले असून गोव्यातून ही दारू मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी घेऊन जाण्यात येत, असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती मिरजचे पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क काय करतय ?

मागील 24 तासांत मिरज तालुक्यात अवैध दारू तस्करी विरोधातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. शनिवारी (दि. 29 मे) मिरज शहर पोलिसांनी गोवा बनावटीचा विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच विदेशी दारुचा मोठा साठा जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून अवैध दारूच्या विरोधात कारवाई सुरू असताना सांगलीचे राज्य उत्पादन शुल्क विभाग काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - गोवा बनावटीच्या विदेशी दारूची तस्करी; तिघांना अटक करुन एक लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Last Updated : May 30, 2021, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.