ETV Bharat / state

मिरजेचे शासकीय रूग्णालय पुन्हा कोविड रुग्णालय म्हणून घोषित - मिरज कोविड रुग्णालय

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मिरज येथील शासकीय रुग्णालय पुन्हा कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मिरज रुग्णालय
मिरज रुग्णालय
author img

By

Published : Feb 27, 2021, 2:17 AM IST

Updated : Feb 27, 2021, 5:43 AM IST

मिरज (सांगली) - सध्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने मिरजेचे शासकीय रूग्णालय पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. 1 मार्च, 2021 पासून पुन्हा याठिकाणी फक्त कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

मिरजेचे शासकीय रूग्णालय पुन्हा कोविड रुग्णालय म्हणून घोषित

पुन्हा फक्त कोरोना रुग्णांवर उपचार

सध्या मिरज रुग्णालयात कोरोनासह इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिनांक 1 मार्चपासून कोरोनाग्रस्त व संशयीत रुग्णावरच वैद्यकीय उपचार सुविधा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी रुग्णालयाला दिले आहेत. त्यामुळे आता याठिकाणी पुन्हा फक्त कोरोना रुग्णालयाल सुरू राहणार आहे. त्यामुळे मिरज व आसपासच्या नागरिकांनी नॉन-कोविड रूग्णांना वैद्यकीय उपचारासाठी सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे 1 मार्चपासून वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत यांनी केले आहे.

पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 28 मार्च, 2020 पासून कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नॉन कोविड रूग्णांसाठीही काही चिकित्सालयीन विभागातील रूग्णसेवा 1 फेब्रुवारी, 2021 पासून सुरू करण्यात आली होती. पण, सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने, हे रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे डॉ. दिक्षीत यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - भर कार्यक्रमात शिवसेनेच्या आमदारांना संभाजी भिडे यांनी मास्क काढायला लावला

Last Updated : Feb 27, 2021, 5:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.