ETV Bharat / state

इंधनदरवाढीवरुन मंत्री विश्वजित कदमांची क्रेंद्र सरकारवर टीका - विश्वजित कदम न्यूज

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या अडचणी असताना डीजल,पेट्रोलचे दर प्रचंड वाढले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर शंभर रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची पिळवणूक होत आहे. याचाच निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगलीत आंदोलन करण्यात आले.

इंधनदरवाढीवरुन मंत्री विश्वजित कदमांची क्रेंद्र सरकारवर टीका

author img

By

Published : Feb 6, 2021, 4:04 PM IST

Updated : Feb 6, 2021, 10:10 PM IST

सांगली - केंद्रातील भाजपाला सर्व सामन्यांचे दुःख कळत नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केला आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने सांगलीत आंदोलन करण्यात आले होते. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र सकराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

इंधन दरवाढीचा निषेध

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात देशभर संतप्त पडसाद उमटत आहेत. सांगलीमध्येही या दरवाढीचे पडसाद उमटत आहेत. सांगली जिल्हा काँगेसच्यावतीने केंद्राच्या या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला आला. शहरातील काँग्रेस कमिटी समोर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील,काँग्रेस नेते विशाल पाटील,जयश्रीताई पाटील यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

केंद्राला सर्वसामान्यांच्या दुःख काळत नाही

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या अडचणी असताना डीजल,पेट्रोलचे दर प्रचंड वाढले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर शंभर रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची पिळवणूक होत आहे. याचाच निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगलीत आंदोलन करण्यात आले. यावेळी रसत्यावर उतरत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारला सर्वसामान्य जनतेचे दु:ख कळत नसल्याचा आरोप कदम यांनी केला.

Last Updated : Feb 6, 2021, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.