ETV Bharat / state

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

प्राथमिक स्तरावर पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये रोख आणि 5 हजारांची धान्याची मदत केली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

vijay wadettiwar
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jul 27, 2021, 4:32 AM IST

Updated : Jul 27, 2021, 4:44 AM IST

सांगली - प्राथमिक स्तरावर पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये रोख आणि 5 हजारांची धान्याची मदत केली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच नेहमी येणारा महापूर आणि इतर आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा स्तरावर एनडीआरएफच्या धर्तीवर एसडीआरएफ पथके निर्माण करून कायमस्वरूपी तैनात ठेवण्यात येतील, असेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

माहिती देताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
  • पूर पाहणी आणि पूरग्रस्तांशी संवाद -

सांगलीतील महापुराच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी शहरातील पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व काँग्रेसच्यावतीने सुरू असलेल्या पूरग्रस्त निवारा केंद्राला भेट दिली. तसेच याठिकाणी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रचंड प्रमाणात यंदा सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकण या ठिकाणी पाऊस पडला आहे. त्याचा परिणाम याठिकाणी महापूर आला आहे. पण आपत्तीच्या या प्रसंगात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युद्धपातळीवर बचावकार्य असेल किंवा अन्य मदत असेल, हे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.

  • पूरग्रस्तांना तातडीची 15 हजारांची मदत -

राज्यात महापुरामुळे नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. न भरून निघणारे असे हे नुकसान आहे. सर्व पातळ्यांवर हे नुकसान झाले आहे. याबाबत राज्य सरकार मदतीची भूमिका घेत आहे. तातडीने प्राथमिक स्तरावर ज्या नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे, त्यांना 10 हजार रुपये रोख आणि 5 हजार रुपयांचे धान्य मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

  • प्रत्येक जिल्ह्यात 'राज्य आपत्ती निवारण पथक' -

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वारंवार महापूर येतो, तर कोकणात वारंवार चक्रीवादळ सारख्या आपत्तीलाही सामोरं जावे लागते. त्यामुळे राज्यातल्या अवर्षणग्रस्त जिल्हे असतील किंवा अन्य ठिकाणी वेगवेगळी आपत्ती निर्माण होतात, अशा परिस्थितीमध्ये तातडीच्या बचाव आणि मदत कार्यासाठी तातडीने मदत मिळण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर 'राज्य आपत्ती निवारण पथक'उभारण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. एनडीआरएफच्या क्षमतेची ही पथके उभारली जातील, ज्यामुळे कोणत्याही आपत्तीमध्ये त्या ठिकाणी ती पथकं तातडीने उपलब्ध होतील, असे मत मंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

  • जिल्ह्यात होणार 'आपत्ती आदेश नियंत्रण सेंटर' -

सांगली जिल्ह्यात वारंवार येणारा महापूर लक्षात घेऊन जिल्ह्यात 'आपत्ती आदेश नियंत्रण सेंटर' ( DCCC ) सुरू करण्यात येईल. त्याबाबत लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन वर्षभरात हे सेंटर सुरू होईल, असा विश्वास यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच दरवर्षी पूरपरिस्थिती येणार असेल तर कायमस्वरूपी काही कुटुंब आणि डोंगराच्या खालील गावांचे पुनर्वसन करण्यात येईल. सांगली शहराच्या पुनर्वसन नियोजनाबाबतही सर्वानुमते विचार केला जाईल, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Jul 27, 2021, 4:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.