सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. तसेच नेहमी भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, असा खोचक सल्ला मंत्री पाटील यांनी राज ठाकरेंना दिला आहे,ते मिरजेत बोलत होते.
काँग्रेसकडूनचं राष्ट्रवादीच्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसला गेलाय, मंत्री जयंत पाटलांचा पलटवार - सांगली काँग्रेस बातमी
भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युती करून काँग्रेस अध्यक्ष केला नंतर सभापतींच्या निवडीमध्ये मात्र काँग्रेसने दुर्लक्ष करून राष्ट्रवादीची फसगत केली. 2015 मध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याठिकाणी भाजपाचे परिणय फुके निवडून आले,त्या वेळी काँग्रेसने उघडपणे भारतीय जनता पार्टीला साथ दिली. बरोबर गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद असतील या निवडणुकांमध्येही काँग्रेसने भाजपला साथ दिली आहे. ठरलं होतं त्याप्रमाणे त्याचा कोणताही पालन कॉंग्रेसकडून झाले नाही,त्यामुळे काँग्रेसने किती वेळा खंजीर खुपसला,ही त्याची यादी आहे,अशा शब्दात जयंत पाटील यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.
![काँग्रेसकडूनचं राष्ट्रवादीच्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसला गेलाय, मंत्री जयंत पाटलांचा पलटवार minister jayant patil on congress leader nana patole in sangli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15285001-463-15285001-1652525858225.jpg?imwidth=3840)
काँग्रेसकडूनचं राष्ट्रवादीच्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसला गेलाय
सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. तसेच नेहमी भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, असा खोचक सल्ला मंत्री पाटील यांनी राज ठाकरेंना दिला आहे,ते मिरजेत बोलत होते.
काँग्रेसकडूनचं राष्ट्रवादीच्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसला गेलाय
काँग्रेसकडूनचं राष्ट्रवादीच्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसला गेलाय
Last Updated : May 14, 2022, 6:26 PM IST