ETV Bharat / state

आटपाडी ग्रामपंचायत लवकरच होणार नगरपंचायत - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे - sangli minister eaknath shinde news

अनेक नेत्यांनी आटपाडी ग्रामपंचायतीचा विकासासाठी नगरपंचायत करण्याबाबतची मागणी केली.या मागणीला धरून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत करण्याच्या बाबतीत हा निर्णय तातडीने घेतला जाईल,अशी घोषणा केली.तसेच आटपाडी नगरपंचायतीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल,अशी ग्वाही देखील मंत्री एकनाथ शिंदे यांनी,यावेळी दिली.

minister eaknath shinde on aatpadi grampanchayat in sangli
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jun 1, 2022, 7:51 PM IST

Updated : Jun 1, 2022, 8:11 PM IST

सांगली - आटपाडी ग्रामपंचायतीचे, नगरपंचायत करण्याबाबतचा निर्णय तातडीने घेतला जाईल,अशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच आटपाडी नगरपंचायतीसाठी लागेल,तो निधी देण्यात येईल,असे आश्वासन देखील मंत्री शिंदे यांनी दिला आहे. आटपाडी ठिकाणी आयोजित समारंभात ते बोलत होते.

आटपाडी ग्रामपंचायत लवकरच होणार नगरपंचायत
आटपाडी मध्ये पार पडला शेतकरी मेळावा - आटपाडी याठिकाणी शिवसेनेच्यावतीने शेतकरी मेळावा पार पडला.यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थिती लावली होती.यानिमित्ताने शिवसेना आटपाडी नेते तानाजी पाटील यांचा शिवसेनेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या मेळाव्याला खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांच्यासह शिवसेनेचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आटपाडी ग्रामपंचायत होणार नगरपंचायत - या निमित्त आयोजित समारंभांमध्ये अनेक नेत्यांनी आटपाडी ग्रामपंचायतीचा विकासासाठी नगरपंचायत करण्याबाबतची मागणी केली.या मागणीला धरून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत करण्याच्या बाबतीत हा निर्णय तातडीने घेतला जाईल,अशी घोषणा केली.तसेच आटपाडी नगरपंचायतीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल,अशी ग्वाही देखील मंत्री एकनाथ शिंदे यांनी,यावेळी दिली.31 लाखांच्या बोकडाचा ही सत्कार - दरम्यान या सोहळ्या दरम्यान तब्बल 31 लाखांच्या माडग्याळ जातीच्या बोकडाचा सत्कारही पार पडला.मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजा नामक बोकडाचा सत्कार करण्यात आला.अवघ्या 2 महिने 8 दिवसांच्या असणाऱ्या या माडग्याळ जातीच्या बोकडाचा चेहरा अगदी पोपटाच्या चोचे प्रमाणे आहे. आणि हे भागडे बोकड पाहून आणि त्याचा चेहरा पाहून मंत्री महोदय देखील आश्चर्यचकित झाले होते आटपाडी तल्या विलास पाटील यांच्याकडे हा 31 लाखांचा राजा बोकड आहे.सध्या तो जिल्ह्यातच नव्हे, तर अन्य राज्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Last Updated : Jun 1, 2022, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.