ETV Bharat / state

सांगलीत चक्क जिवंत महिलेची तिरडी ओढून पालिकेविरोधात दलित महासंघाचे आंदोलन

स्मशानभूमीतील गैर कारभारा विरोधात दलित महासंघाच्या वतीने तीरडी मोर्चा काढण्यात आला. या प्रतिकात्मक तिरडीला ओढत पालिके समोर आंदोलन करण्यात आले.

सांगलीत तिरडी ओढून पालिके विरोधात दलित महासंघाचे आंदोलन
author img

By

Published : Nov 18, 2019, 10:53 PM IST

सांगली - स्मशानभूमीतील गैर कारभाराविरोधात दलित महासंघाच्या वतीन पालिकेवर जिवंत तिरडी मोर्चा काढण्यात आला. प्रतिकात्मक तिरडीला ओढत पालिकेच्या कारभाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

सांगलीत तिरडी ओढून पालिके विरोधात दलित महासंघाचे आंदोलन

सांगली शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीत महापालिका प्रशासनाकडून सुविधा पुरवण्या ऐवजी मृतदेहाची हेळसांड होत आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाकडून गैरकारभार सुरू असल्याचा आरोप दलित महासंघाच्यावतीने करण्यात आला. स्मशानभूमीत सुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे. त्याचबरोबर त्या परिसरात अनेक अवैध उद्योग सुरू असल्याचा आरोप दलित महासंघाच्या वतीने करत आज सांगली महापालिका विरोधात आंदोलन करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून पालिकेवर जिवंत व्यक्तीचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. एका महिलेला या तिरडीवर झोपवून ही प्रतिकात्मक तिरडी ओढत नेऊन पालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाने स्मशानभूमीतील सुविधांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यास, या पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला.

Intro:File name - mh_sng_03_tirdi_morcha_vis_01_7203751 - to - mh_sng_03_tirdi_morcha_byt_04_7203751

स्लग - स्मशानभूमीतील कारभारा विरुद्ध चक्क जिवंत महिलेची तिरडी ओढून पालिके विरोधात दलित महासंघाचे आंदोलन...

अँकर - सांगलीतील स्मशानभूमीत गैरकारभार सुविधा असल्याचा दलित महासंघाच्या वतीने पालिकेवर जीवंत तिरडी मोर्चा काढला.प्रतिकात्मक या तिरडीला ओढत पालिका कारभाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.Body:सांगलीत शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये सांगली महापालिका प्रशासनाकडून सुविधा पुरवण्या ऐवजी मृतदेहांची हेळसांड आणि याठिकाणी आरोग्य विभागाकडून गैरकारभार सुरू असल्याचा आरोप दलित महासंघाच्यावतीने करण्यात आला आहे. स्मशानभूमीत सुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे ,त्याचबरोबर त्या परिसरात अनेक अवैध उद्योग सुरू असल्याचा आरोप दलित महासंघाच्या वतीने करत आज सांगली महापालिका विरोधात आंदोलन करण्यात आले.पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून पालिकेवर जिवंत व्यक्तीचा तिरडी मोर्चा काढण्यात आला.एका महिलेला या तिरडीवर झोपवून ही प्रतिकात्मक तिरडी ओढत नेऊन पालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आले.दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत पालिका प्रशासनाने स्मशानभूमीतील सुविधांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यास,या पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी दिला आहे.

बाईट - उत्तम मोहिते - जिल्हाध्यक्ष, दलित महासंघ ,संघ .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.