ETV Bharat / state

सांगलीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवरून प्रचार; पर्यावरण रक्षणाचा संदेश देत मागणार मते - cycal rally

दत्ता पाटील यांनी आपल्या सायकलवरून थेट मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

सायकलवरुन प्रचार करताना
author img

By

Published : Apr 17, 2019, 11:07 AM IST

सांगली - मला मत द्या, त्याच बरोबर पाणी जपून वापरा, झाडे लावा, पर्यावरणाचे रक्षण करा, असा सामाजिक संदेश देत एका अपक्ष उमेदवाराने चक्क सायकलवरून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दत्ता पाटील असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. पाटील ५ दिवसांत सांगलीच्या वाड्या वस्त्यांवर बाराशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहेत.

सायकलवरुन प्रचार करताना

सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप, स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात काट्याची टक्कर आहे. असे असले तरी या निवडणुकीच्या रिंगणात इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारही कमी नाहीत. अशा प्रकारचा सायकलवरुन केलेला प्रचार लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दत्ता पाटील यांचे निवडणुकीचे चिन्हही सायकल पंप आहे.

सांगली लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर सगळ्याच पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. आज पासून दत्ता पाटील यांनी आपल्या सायकलवरून थेट मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. सांगलीच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत आपल्याला द्यावे, अशी विनंती करत पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेशही पाटील देणार आहेत.

या प्रचाराच्या माध्यमातून दत्ता पाटील सध्याची पाणी टंचाई लक्षात घेता पाणी वाचवा आणि एक झाड लावा, असा सामजिक संदेश पाटील मतदारांना देत आहेत. आपल्या प्रचारासाठी दत्ता पाटील हे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सायकलवरून फिरणार आहेत. तब्बल बाराशे किलोमीटरचा हा प्रवास असून सलग ५ दिवस पाटील नॉनस्टॉप प्रचार करणार आहेत. मंगळवारी सांगलीमधून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

avb

feed send file name - R_MH_1_SNG_16_APR_2019_APKASH_UMEDWAR_SAYKAL_PRACHAR_SARFARAJ_SANADI - to -
R_MH_4_SNG_16_APR_2019_APKASH_UMEDWAR_SAYKAL_PRACHAR_SARFARAJ_SANADI

स्लग - सायकलवरून अपक्ष उमेदवाराने सुरू केला प्रचार,मतांच्या बरोबर पाणी वाचवा आणि झाडे लावण्याचे मतदारांना हाक ..

अँकर - एक मत द्या त्याचा बरोबर पाणी वाचवा आणि झाडे लावा,असा सामाजिक संदेश देत एका अपक्ष उमेदवाराने चक्क सायकलवरून आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे.दत्ता पाटील असे या अपक्ष उमेदवाराचे नाव असून पाटील हे पाच दिवस १२०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करत लोकसभा निवडणूकीचा प्रचार करणार आहेत.

Body:व्ही वो - सांगली लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात भाजपा,
स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि वंचित आघाडी यांच्यात काट्याची लढत होत आहे.असे असले तरी या निवडणुकीच्या रिंगणात इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारही कमी नाहीत,अश्याच एका अपेक्षा उमेदवाराने सध्या आपल्या प्राचाराच्या अनोख्या स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.दत्तात्रय पाटील असे या सायकल पट्टू उमेदवाराचे नाव आहे.दत्ता पाटील आणि सायकल असे समीकरण असून या निवडणुकीतही याची प्रचिती नागरिकांना येत आहे.तर पाटील यांना या निवडणुकीत सायकल पंप हे चिन्ह मिळाले आहे.सांगली लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर सगळयाच पक्षांनी प्रचाराचा धडका उडवून दिलेले असताना,या प्रचाराच्या गर्दीत दत्ता पाटील यांनी हटके आणि आवाक करणारा प्रचार सुरू केला आहे.आज पासून दत्ता पाटील यांनी आपल्या सायकलवरून थेट मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरवात केली आहे.सांगलीच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत आपल्याला द्यावे अशी विनंती करताना,पाटील यांनी सामाजिक संदेश देणारे अभियानही हाती घेतले आहे.
या प्रचाराच्या माध्यमातून दत्ता पाटील यांनी सध्याची पाणी टंचाई लक्षात घेता पाणी वाचवा आणि एक झाड लावा असा सामजिक संदेश पाटील मतदारांना देत आहे.आपल्या प्रचारासाठी दत्ता पाटील हे संपूर्ण लोकसभा मतदार संघात सायकलवरूनचं फिरणार आहेत.तब्बल १२०० किलोमीटरचा हा प्रवास असून सलग पाच दिवस पाटील नॉनस्टॉप प्रचार करणार आहेत.आज सांगली मधून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

बाईट - दत्ता पाटील - अपक्ष उमेदवार - सांगली लोकसभा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.